शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
4
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
5
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
6
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
7
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
8
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
9
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
10
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
11
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
12
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
13
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
14
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
15
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
16
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
17
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
18
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
19
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
20
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
Daily Top 2Weekly Top 5

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी दुकानाच्या बिलातून जनजागृती

By admin | Updated: February 14, 2015 01:38 IST

कारंजा येथील ट्रक्टर व्यवसायिकाचा अभिनव प्रयोग.

दादाराव गायकवाड/ कारंजा (वाशिम):स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन अनेक योजना राबवित आहे, जनजागृती करित आहे. सरकारच्या या प्रयत्नांना हातभार लावून स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी, तसेच बेटी बचाओ अभियानाचा प्रचार करण्यासाठी कारंजा येथील एका ट्रॅक्टर व्यावसायिकाकडून दुकानाच्या बिलांचा वापर केला जात आहे.देशात महिलांचे पुरूषांमागील दरहजारी प्रमाण कमी आहे. ब्रिटिश मेडिकल र्जनलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार १९८0 ते २0११ या दरम्यानच्या काळात भारतात १.२0 कोटी मुलींची गर्भातच हत्या करण्यात आल्याचे निरिक्षण नोंदविण्यात आले आहे. स्त्रीभ्रूण हत्येचे हे प्रमाण लक्षात घेता, राज्य सरकार आणि केंद्र सरकारमार्फत स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. एक सामाजिक बांधिलकी म्हणून ट्रॅक्टरचे सुटे पार्टस्, तसेच ट्रॅक्टर्सची विक्री करणार्‍या कारंजा येथील एका व्यावसायिकाने दुकानाच्या बिलावर स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याचा संदेश मुद्रीत केला. या बिलाच्या माध्यमातून स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न ते गत दोन वर्षांपासून करीत आहेत.ह्यखुडू नको कळी आई.. जगू दे गं मला, दिवा हवा वंशाचा पणती नको का गं तुलाह्ण अशी मार्मिक ओळ या व्यवसायिकाने बिलाच्या मागील बाजुला दिली आहे. ह्यभ्रूण हत्या एक ऐसा अपराध है, जिसका कोई प्रायश्‍चित्त नहीह्ण असाही संदेश या व्यवसायिकाने दिला आहे. ह्यया जगात कोणतीही मुलगी ही तिच्या पतीसाठी त्याची राणी नसेलही कदाचित; पण.. तिच्या वडिलांसाठी नेहमीच ती एक सुंदर परी असेलह्ण, एका पित्याला हेलावून टाकणार्‍या या हृदयस्पश्री ओळीही बिलाच्या माध्यमातून लोकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न हा व्यवसायिक करीत आहे.