शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
4
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
5
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
6
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
7
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
8
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
9
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
10
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
11
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
12
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
13
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
14
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
15
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
16
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
17
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
18
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
19
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
20
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या बिंदू नामावलीत मराठा आरक्षणाची होणार तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:36 IST

जानेवारी २०१९ पासून बिंदू नामावलीत मराठा आरक्षणानुसार बिंदूचा समावेश करण्याचे निर्देश दिले आहेत.

- आशिष गावंडे लोकमत न्यूज नेटवर्कमहापालिकेतील रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्यासाठी प्रशासनाद्वारे सरळसेवा पदभरती राबवल्या जाणार आहे. त्याकरिता बिंदू नामावली अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला मनपा प्रशासनाने प्रारंभ केला असून, जानेवारी २०१९ पासून त्यामध्ये मराठा आरक्षणाच्या तरतुदीचा समावेश करण्यात येईल. बिंदू नामावलीत १३ टक्के मराठा आरक्षण आणि १० टक्के आर्थिक दुर्बल घटकातील (खुला प्रवर्ग) आरक्षणाचा समावेश केल्यानंतरच बिंदू नामावली निश्चित करून तसा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे.महापालिकेची प्रशासकीय गाडी रूळावर आणण्यासाठी महापौर विजय अग्रवाल यांनी तांत्रिक व लेखा संवर्गातील ७३५ रिक्त पदांसाठी सरळसेवा पदभरती राबवण्याचे निर्देश ७ नोव्हेंबर रोजीच्या आढावा बैठकीत मनपा आयुक्त संजय कापडणीस यांना दिले होते. मनपा प्रशासनाने २००४ पासून बिंदू नामावली अद्ययावत केली नसल्याने अनुसूचीत जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष सी.एस.थूल यांनी बिंदू नामावली अद्ययावत करण्याचे निर्देश आॅगस्ट २०१५ मध्ये महापालिकेला दिले होते. त्यानुषंगाने सप्टेंबर २०१५ मध्ये तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी बिंदू नामावलीचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला दिले होते. या विभागाने चार महिन्यांत प्रस्ताव तयार करून २०१६ मध्ये सदर प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केला होता. पदोन्नती प्रक्रियेच्या बिंदू नामावलीला मंजुरी मिळाली नसली तरी सरळ सेवा पदभरतीच्या नामावलीला विभागीय आयुक्त कार्यालयाने मंजुरी दिली होती. यादरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात शासन निर्णय ध्यानात घेऊन मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी सामान्य प्रशासन विभागाला जानेवारी २०१९ पासून बिंदू नामावलीत मराठा आरक्षणानुसार बिंदूचा समावेश करण्याचे निर्देश दिले आहेत.१३ टक्के मराठा आरक्षणाची तरतूदमराठा आरक्षणाच्या संदर्भात मनपाला अधिसूचना व निर्देश प्राप्त झाले आहेत. यामध्ये १३ टक्के मराठा आरक्षण आणि १० टक्के आर्थिक दुर्बल घटकातील (खुला प्रवर्ग)आरक्षणाचा समावेश आहे. सुधारित बिंदू नामावली निश्चित झाल्यानंतर पुढे भविष्यात खुल्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचे आरक्षण व सेवाज्येष्ठतेचे निकष लक्षात घेऊन त्या-त्या पदांवर पदोन्नती द्यावी लागेल. सरळसेवा पदभरतीद्वारे खुल्या प्रवर्गातील पात्र उमेदवारांचा मार्ग मोकळा होणार असल्याने या पदभरतीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

दर तीन वर्षांनंतर पुनर्तपासणी२५ जानेवारी २०१६ मध्ये मनपाने विभागीय आयुक्तांकडे सादर केलेल्या बिंदू नामावलीमध्ये सरळसेवा पदभरतीला मंजुरी दिली होती. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर हा बिंदू नामावलीचा कालावधी निश्चित आहे. यामध्ये वर्षभराचा गोषवारा तयार केला जातो. मनपा प्रशासनाने दर तीन वर्षांनंतर बिंदू नामावली अद्ययावत करून पुनर्तपासणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करणे क्रमप्राप्त आहे.

मराठा आरक्षण १३ की १६ टक्के या मुद्यावर प्रशासकीय स्तरावर संभ्रम होता. हा संभ्रम दूर झाला असून, १३ टक्के आरक्षणानुसार मनपाची सुधारित बिंदू नामावली तयार केली जाईल. तसे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला दिले असून, हा विभाग कामाला लागला आहे. पुढील आठ-दहा दिवसांत बिंदू नामावलीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात येईल.-संजय कापडणीस, आयुक्त, मनपा.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका