शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

काटीपाटी बॅरेजचा प्रस्ताव पाठवणार !

By admin | Updated: August 20, 2016 02:43 IST

खारपाणपट्टय़ातील सिंचन प्रकल्पांची शृंखला पूर्ण होणार; प्रभाव लोकमतचा.

अकोला, दि १९ : वर्‍हाडातील शापित खारपाणपट्टय़ात प्रथमच सहा बॅरेजेस (सिंचन प्रकल्प) होत आहेत. स्वातंत्र्यानंतर प्रथमच या प्रकल्पाची शृंखला तयार झाली आहे; पण शृंखलेला पूर्ण करणार्‍या काटीपाटी बॅरेजचे काम रखडले आहे. या आशयाचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच पाटबंधारे मंडळाने दखल घेत हा प्रकल्प होण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या असून, येत्या पंधरा दिवसात या प्रकल्पाच्या बांधकामासाठीच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी जलसंपदा महामंडळाकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे.पश्‍चिम वर्‍हाडात खारपाणपट्टा आहे. या भागातील भूगर्भात ४0 ते ५0 मीटर खाली खडक नसल्याने धरण होऊ शकत नसल्याचे अभिप्राय जलसंपदा तज्ज्ञांनी यापूर्वी दिल्याने अनेक वर्ष या भागात प्रकल्प झाले नाहीत. या भागातील स्थिती सातत्याने लोकमतने मांडली. जनता व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला. शेवटी नवीन तंत्रज्ञान वापरू न प्रकल्पांच्या कामांना सुरुवात झाली. त्यामुळे खारपाणपट्टय़ातील बुलडाणा जिल्हय़ात पहिला मेगा जिगाव सिंचन प्रकल्प तयार होत असून, अकोला जिल्हय़ातील नया अंदुरा, नेरधामणा (पूर्णा-२) बॅरेज, मूर्तिजापूूर तालुक्यातील घुंगशी, काटेपूर्णा बॅरेज, उमा बॅरेजची कामे सुरू झाली आहेत. अमरावती जिल्ह्यातही पूर्णा बॅरेजचे काम सुरू आहे. या शृंखलेत काटीपाटीचे बॅरेजचे काम रखडले आहे. आता या बॅरेजचे स्पेशल डिझाईन करण्यात आले आहे. त्यामुळे या बॅरेजची किंमत ३२५ कोटी रुपये वाढली असून, हे बॅरेजच होण्यासाठीच्या हालचाली वाढल्या आहेत.खारपाणपट्टय़ातील शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील बॅरेज असल्याने या बॅरेजला मापदंड लावू नये यासाठीची विनंती शासनाकडे करण्यात आली आहे. हे बॅरेज झाल्यास ८.२४ दलघमी जलसाठा संकलित होईल. तसेच १८00 हेक्टर क्षेत्रावर सिंचन होणार असल्याने पाटबंधारे मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यासह लोकप्रतिधींनीही या बॅरेजसाठी पाठपुरावा सुरू केला आहे.काटीपाटी बॅरेज शेतकरी आत्महत्याग्रस्त खारपाणपट्टय़ात असल्याने या बॅरेजचे मापदंड शिथिल करावे असा पत्रव्यवहार शासनासोबत केला आहे. या बॅरेजचे डिझाईन बदलल्याने किंमत वाढली आहे; पण हे बॅरेज होणार असून, या महिन्याच्या शेवटापर्यंत सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी जलसपंदा महामंडळाकडे प्रस्ताव पाठवणार आहोत.- अंकुर देसाई,अधीक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळ,अकोला.