शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन घटले, बाजार समित्या ओस!

By admin | Updated: October 28, 2014 01:01 IST

शेतमाल उत्पादनात प्रचंड घट; आतापर्यंत केवळ २0 हजार क्विंटल सोयाबीनची आवक.

विवेक चांदूरकर / अकोलायावर्षी निसर्ग शेतकर्‍यांवर कोपला असून, पावसाने दांडी मारल्याने शेतमाल उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. याचा थेट परिणाम बाजार समित्यांमध्ये होणार्‍या उलाढालीवर झाला आहे. आडातच नाही, तर पोहर्‍यात कोठून येणार?, या उक्तीप्रमाणे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनसह अन्य शेतमालांची आवक नगण्य आहे. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात अकोला कृषि उत्पन्न बाजार समितीत पावणे दोन लाख क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती, यावर्षी आतापर्यंत केवळ २0 हजार क्विंटलची आवक झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही आवक अवघी १0 टक्के आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला दोन महिने पाऊस झाला नाही. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांनी मूग व उडिदाची अल्प क्षेत्रात पेरणी केली. त्यांची आशा सोयाबीनवर व पुढील पावसावर टिकून होती; मात्र संपूर्ण पावसाळ्या तच पाऊस कमी झाला, परतीचाही पाऊस बरसला नाही. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले, दाणाही बारीक राहिला. यावर्षी एकरी सरासरी दोन ते तीन क्विंटल उत्पादन झाले. काही शे तकर्‍यांना तर एकरी अवघे ४0 ते ५0 किलो उत्पादन झाले आहे. अकोला कृषि उत्पन्न बाजार समितीत सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून शेतकर्‍यांनी सोयाबीन विक्रीला आणले. २७ ऑक्टोबरपर्यंत केवळ २0 हजार क्विंटलचीच समितीत आवक झाली आहे. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात ही आवक पावणे दोन लाख क्विंटल होती. गत सहा दिवस म्हणजे २१ ते २५ ऑक्टोबरदरम्यान बाजार समिती बंद असतानाही सोमवारी केवळ पाच हजार क्विंटल सोयाबीन शेतकर्‍यांनी समितीत आणले. दररोज सरासरी दोन ते तीन हजार क्विंटलच आवक होत आहे. गतवर्षी याच मोसमात दरदिवशी १५ ते २0 हजार क्विंटल होत होती. यावर्षी सोयाबीनला २७00 ते ३१00 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.