प्रभातचे कुस्तीपटू विभागीय स्तरावर

By Admin | Updated: August 28, 2015 00:02 IST2015-08-28T00:02:44+5:302015-08-28T00:02:44+5:30

अकोला जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रभातच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारू न वर्चस्व राखले.

Prabhat wrestlers at the departmental level | प्रभातचे कुस्तीपटू विभागीय स्तरावर

प्रभातचे कुस्तीपटू विभागीय स्तरावर

अकोला: जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रभातच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारू न वर्चस्व राखले. बुधवार २६ ऑगस्ट रोजी वसंत देसाई क्रीडांगण येथे स्पर्धा पार पडली. यामध्ये प्रभातचे खेळाडू विश्‍वजित राठोड याने १४ वर्षाआतील गटात ३५ किलो वजनगटात, ५५ किलो वजनगटात सुजल अनासने, ६0 किलो वजनगटात अभिषेक निकाळजे, १७ वर्षाआतील गटात ५५ किलो वजनगटात स्वराज भांबुरकर, ६९ किलो वजनगटात सर्वेश पातुर्डे यांनी प्रथम स्थान मिळविले. विजेत्यांची निवड विभागीय स्तर स्पर्धेसाठी झाली आहे. क्रीडा प्रशिक्षक अनिल कांबळे, क्रीडा विभागप्रमुख संतोष लोमटे, प्राचार्य कांचन पटोकार, उपप्राचार्य वृषाली वाघमारे यांनी खेळाडूंचे कौतुक केले.

Web Title: Prabhat wrestlers at the departmental level