शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटाच्या महिला करणार आता कुक्कुटपालन उद्योग!

By admin | Updated: November 29, 2014 22:12 IST

कृषी समृध्दी प्रकल्पाचा पुढाकार: विदर्भातील १९,२00 कुटुंबांना फायदा.

वाशिम: कृषी समृध्दी प्रकल्पाच्या माध्यमातून कुक्कुटपालनासाठी आर्थिक सहकार्य करण्यात येणार असल्याने, यापुढील काळात महिला बचत गटाचे सदस्य मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन उद्योगाकडे वळतील असे चित्र, ह्यकम्युनिटी मॅनेज्ड रिसोर्स सेंटरह्ण (सीएमआरसी)तर्फे महिलांना देण्यात येत असलेल्या प्रशिक्षणातील उत्स्फूर्त सहभागावरून दिसून येत आहे. विदर्भातील सहा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयांमधील तब्बल १९,२00 कुटुंबांना याचा लाभ होण्याची अपेक्षा आहे.विदर्भातील सहा जिल्हयातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबविण्यासाठी कृषी समृध्दी प्रकल्पाच्या माध्यमातून, शेतकरी, शेतमजुर, महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिला बचत गटांच्या माध्यमातून शेतीशी निगडीत असे उद्योग उभारण्यात येत आहेत. आता ग्रामीण भागातील महिलांना कुक्कुटपालन हा लघुउद्योग सुरू करता यावा, यासाठी ३0 टक्के अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. सदर उद्योग सक्षमपणे उभा रहावा याकरीता महिलांना उद्योगाविषयी सखोल मार्गदर्शन देण्यासाठी विशेष प्रशिक्षणाचेही आयोजन करण्यात येत आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्हयांमधील एकूण ६४ क्लस्टरमधील प्रत्येक कलस्टरमधील ३00, याप्रमाणे १९,२00 कुटुंब सदस्यांचा या योजनेत सहभाग राहील. सध्या वाशिम जिल्हयातील मालेगाव तालुक्यातील २५ गावांमधील ३00 महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाच्या तयारीस प्रारंभही झाला आहे. कुक्कुटपालन व्यवसाय उभारणीकरीता एकूण ७,५00 रूपये गुंतवणूक करण्याची आवश्यकता असून, त्यापैकी ३0 टक्के रक्कम कृषी समृध्दी प्रकल्पाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. वाशिम जिल्हयातील सहा तालुक्यांमध्ये महिला बचत गटाच्या एकूण २,१00 महिला सदस्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे लोकसंचालीत साधन केंद्राचे व्यवस्थापक प्रा. शरद व्ही.कांबळे यांनी लोकमतशी बोलताना सांगीतले.