शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

बाळापुरातील पाच खासगी रुग्णालयांचे ‘पोस्टमार्टेम’

By admin | Updated: March 19, 2017 02:54 IST

विशेष तपासणी पथकाने शुक्रवारी छापा मारला.

अकोला, दि. १८- रुग्णालय चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध नियम व कायद्यांना धाब्यावर बसविणार्‍या बाळापूर येथील पाच डॉक्टरांच्या रुग्णालयांवर आरोग्य विभागाकडून गठित करण्यात आलेल्या विशेष तपासणी पथकाने शुक्रवारी छापा मारला. यावेळी दोन रुग्णालयांची तपासणी करण्यात येऊन, त्यांचे नर्सिंग होम बंद करण्यात आले. तर उर्वरित तीन डॉक्टरांनी रुग्णालय बंद करून पलायन केल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली. म्हैसाळ जि. सांगली येथे स्त्री भ्रूणहत्या रॅकेट उघडकीस आल्याच्या पृष्ठभूमीवर आरोग्य विभागाने १५ मार्च ते १५ एप्रिलदरम्यान राज्यात खासगी रुग्णालयांची तपासणी करण्याची धडक मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले असून, त्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण स्तरावर समित्यांची स्थापनाही करण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हय़ातील पहिली कारवाई बाळापूर येथे शुक्रवारी करण्यात आली. यासाठी गठित करण्यात आलेल्या पथकाने शुक्रवारी दुपारी बाळापूर येथील फैज क्लिनिक, राऊत बाल रुग्णालय येथे छापा टाकला. यावेळी फैज क्लिनिकचे संचालक डॉ. अफसर खान यांनी बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अँक्ट अंतर्गत नोंदणी केलेली नसल्याचे आढळून आले, तसेच या रुग्णालयात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कायदा, बायोमेडिकल वेस्ट, अग्नि प्रतिरोधक यंत्रणा, अन्न व औषध कायद्याचे उल्लंघन झाल्याचे पथकास निदर्शनास आले, तर राऊत बालरुग्णालयात अन्न व औषध कायद्याचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. पथकातील सदस्यांनी रुग्णालयांची तपासणी केल्यानंतर त्याबाबतचा अहवाल तयार केला असून, तो जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या नेतृत्वातील जिल्हास्तरीय समितीला सादर करण्यात येणार आहे.या रुग्णालयांना बजावली नोटिसफैज क्लिनिक व राऊत बाल रुग्णालयांमध्ये कारवाई सुरू असल्याचा सुगावा लागताच शहरातील जमजम हॉस्पिटल, राहत हॉस्पिटल व अफजल हॉस्पिटलच्या संचालकांनी त्यांची रुग्णालये बंद करून पळ काढला. पथक तेथे पोहोचल्यानंतर रुग्णालये बंद आढळून आली. त्या तिन्ही रुग्णालयांची नोंद बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अँक्ट अंतर्गत झालेली नसल्याचे आढळून आले आहे. यामुळे पथकातील सदस्यांनी या तिन्ही रुग्णालयांना कारणे दाखवा नोटिस बजावल्या. नियमांचे उल्लंघन करणार्‍या बाळापुरातील २ रुग्णालयांवर कारवाई करून त्यांचे नर्सिंग होम बंद करण्यात आले आहे. इतर तीन रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला