दिवाळीत गरिबांना २० रुपयांत मिळणार १ किलो साखर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 06:24 PM2020-11-08T18:24:27+5:302020-11-08T18:24:45+5:30

२ लाख ८४ हजार ४१० गरीब कुटुंबांना २० रुपये किलो दराने प्रती कुटुंब १ किलो साखर मिळणार आहे.

Poor people will get 1 kg of sugar for Rs 20 on Diwali! | दिवाळीत गरिबांना २० रुपयांत मिळणार १ किलो साखर!

दिवाळीत गरिबांना २० रुपयांत मिळणार १ किलो साखर!

Next

अकोला: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्राधान्य गट व एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारक २ लाख ८४ हजार ४१० गरीब कुटुंबांना २० रुपये किलो दराने प्रती कुटुंब १ किलो साखर मिळणार आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत राज्यातील प्राधान्य गट आणि दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) शेतकरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना नोव्हेंबर महिन्यात प्रती कुटुंब १ किलो साखर वितरित करण्यास शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने ६ नोव्हेंबर रोजी मान्यता दिली आहे. त्यानुसार प्राधान्य गट व एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना २० रुपये किलो दराने प्रती शिधापत्रिका १ किलो साखर रास्तभाव धान्य दुकानांमधून वितरित करण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील प्राधान्य गट व एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारक २ लाख ८४ हजार ४१० कुटुंबांना प्रत्येकी १ किलो साखरचे वितरण जिल्ह्यातील रास्तभाव दुकानांमधून सुरू करण्यात येणार आहे.

२८१४ क्विंटल साखर साठा मंजूर!

जिल्ह्यातील प्राधान्य गट व एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारक २ लाख ८४ हजार ४१० कुटुंबांना नोव्हेंबरमध्ये प्रती शिधापत्रिका १ किलोप्रमाणे साखर वितरित करण्यासाठी २ हजार ८१४ क्विंटल साखरसाठा मंजूर करण्यात आला आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्राधान्यगट व एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रती शिधापत्रिका १ किलोप्रमाणे २० रुपये किलो दराने साखर वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी २ हजार ८१४ क्विंटल साखर साठा मंजूर करण्यात आला आहे. साखर साठा उपलब्ध झाल्यानंतर १२ नोव्हेंबरपासून रास्तभाव दुकानांमधून साखरेचे वितरण सुरू करण्यात येणार आहे.

- बी.यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी

Web Title: Poor people will get 1 kg of sugar for Rs 20 on Diwali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला