शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोपचार रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना निकृष्ट आहार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 12:19 IST

रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरवासीयांमध्ये कोरोना विषाणूची धास्ती निर्माण झाली असतानाच आता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. कोरोनाबाधित रुग्णांना अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात असल्याचे समोर आल्यानंतर याप्रकरणी पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी गठित केलेल्या आहार समितीचे अध्यक्ष विजय अग्रवाल यांच्यावर आहारात सुधारणा करण्याचे निर्देश देण्याची वेळ आली आहे.शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, आज रोजी कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांनी चक्क ३८७ चा आकडा गाठला आहे. ही आकडेवारी प्रशासकीय यंत्रणांच्या कर्तव्यदक्ष कारभाराची पोलखोल करण्यास पुरेशी आहे. दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणांचा अत्यंत उदासीन व गलथान कारभारही रुग्णांच्या वाढत्या संख्येला कारणीभूत ठरू लागला आहे.कोरोनाबाधित रुग्णांच्या वॉर्डात जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाच्यावतीने मूलभूत सुविधांची पूर्तता केली जात नसल्याचा आक्षेप यापूर्वी अनेकदा नोंदविण्यात आला आहे. संबंधित वॉर्डातील स्वच्छतागृहांमध्ये अतिशय घाण तसेच दुर्गंधी पसरल्याची परिस्थिती आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, कोरोनाबाधित रुग्णांना दिल्या जाणारा आहार अतिशय निकृष्ट दर्जाचा व निकषानुसार नसल्याचे समोर आले आहे.संबंधित रुग्णांना अतिशय तिखट व तेलात तळलेल्या दोन भाज्या, भात व एक चपाती एवढाच आहार दिला जात आहे. या गंभीर प्रकारावर शुक्रवारी रात्री ऊहापोह झाल्यानंतर आहार समितीचे अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी कोरोनाबाधित रुग्णांना दिल्या जाणाºया आहारात तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला दिले. त्याचा परिणाम शनिवारी सकाळी दिसून आला.आधी पत्रावळी आता ताट!आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाचे १३१  रुग्ण दाखल आहेत. त्यांना यापूर्वी पत्रावळीमध्ये जेवण दिले जात होते. आहार समितीने दखल घेतल्यानंतर शनिवारपासून रुग्णांना स्टीलच्या ताटामध्ये जेवण देण्यात आले.

कोरोनाबाधित रुग्णांचा आहार अत्यंत पौष्टिक व दर्जेदार असावा, असे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार रुग्णालय प्रशासनाने आहार देण्याची व्यवस्था करावी. रुग्णांच्या तक्रारीत वाढ झाल्यास प्रशासनाची खैर नाही, एवढे निश्चित.- विजय अग्रवाल, अध्यक्ष, आहार समिती.

 

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय