गुंडांचा सहायक पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला

By Admin | Updated: July 11, 2015 01:38 IST2015-07-11T01:38:01+5:302015-07-11T01:38:01+5:30

गुंडांच्या तावडीतून केली प्रवाशांची सुटका

The police sub-inspector of the goons attacked | गुंडांचा सहायक पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला

गुंडांचा सहायक पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला

अकोला: प्रवाशांना मारहाण करून लुटण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुडांना रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या सहायक रेल्वे पोलीस उपनिरीक्षकावर गुंडांनी हल्ला चढवून जबर जखमी केल्याची घटना गुरूवारी रात्री उशीरा अकोला रेल्वे स्थानकावर घडली. जखमी झाल्यानंतरही उपनिरीक्षकाने गुंडांच्या तावडीतून प्रवाशांची सुटका केली. फलाट क्रमांक ५ वर दोन गुंड प्रवृत्तीचे युवक दोन प्रवाशांना मारहाण करून लुटण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसताच, रेल्वे सुरक्षा बलाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक एम.एस. मरकाम यांनी तातडीने धाव घेऊन दोन्ही प्रवाशांना गुंडांच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला; परंतु गुंडांनी त्यांच्याजवळील धारदार शस्त्रांनी मरकाम व दोन प्रवाशांवर वार केले आणि पळून गेले. एएसआय मरकाम गुरुवारी रात्री १२.३0 वाजताच्या सुमारास ड्युटी आटोपून आकोटफैलस्थित निवासस्थानाकडे निघाले असताना, फलाट क्रमांक ५ वर दोन प्रवाशांसोबत दोन गुंड झोंबाझोंबी करीत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी गुंडाच्या दिशेने धाव घेत त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गुंडांना पकडल्यानंतर एका गुंडाने त्याच्याकडील धारदार शस्त्र काढून मसराम व दोन प्रवाशांवर वार केले. दोन्ही प्रवाशी व मरकाम यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेतही मरकाम यांनी गुंडांचा पाठलाग केला; परंतु ते पळून गेले. मरकाम व दोन्ही प्रवाशांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: The police sub-inspector of the goons attacked