शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस खात्यातील विधी अधिकारी कार्यमुक्त

By admin | Updated: September 8, 2014 00:50 IST

पोलिस खात्यातील विधी अधिकारी व विधी निर्देशकांना शासनाने १ सप्टेंबरपासून कार्यमुक्त केले आहे.

विजय शिंदे /आकोटपोलिस खात्यात नेमणूक करण्यात आलेले विधी अधिकारी व विधी निर्देशकांना शासनाने १ सप्टेंबरपासून कार्यमुक्त केले आहे. याबाबतचे आदेश राज्यातील सर्व पोलीस मुख्यालयांना देण्यात आले आहेत. परिणामी, राज्यातील जवळपास ३७१ वकील पुन्हा त्यांच्या खासगी व्यवसायाकडे वळले असून, पोलिस खात्याला कायदेशीर सल्ला देणारे विधी अधिकारी आता न्यायालयात युक्तीवाद करताना दिसणार आहेत.पोलिस विभागाला विधीविषयक मार्गदर्शन करणे, गुन्हा दाखल करण्यापासून तर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करेपर्यंंत तसेच तपासात कायदेशिर सल्ला देणे, न्यायालयासंबधी सर्व प्रकारचे कायदेशिर निराकरण करणे, गुन्हयाबाबतचा अहवाल देणे आदी कामाकरीता कंत्राटी पदावर विधि अधिकारी व विधी निर्देशकांची नेमणुक करण्याचे अधिकार शासनाने २00६ साली एका परिपत्रकान्वये दिले होते. त्यानुसार पोलिस महासंचालक व विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या स्तरावर एक पॅनल तयार करून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच पोलिस प्रशिक्षण केंद्रामध्ये या पदासाठी वकिलांची निवड करण्यात आली होती. १५ ते २0 हजार रूपये मानधनावर त्यांची नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान, हे पद कायमस्वरूपी करण्याच्या मागणीसाठी विधी अधिकारी व निर्देशकांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष हक्क याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय लागेपर्यंंंत कंत्राटी पध्दतीच्या सेवा सुरू ठेवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता; परंतु शासनाने यासंदर्भात केलेल्या विनंती अर्जावर अंतरीम निर्णय देत, सर्वोच्च न्यायालयाने स्वत:चा आदेदश १९ ऑगस्ट २0१४ रोजी मागे घेतला. या आदेशाचा हवाला देत. पोलिस मुख्यालयाचे विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) अतुलचंद्र कुलकर्णी यांनी विधी अधिकारी व विधी निर्देशकांची सेवा कंत्राटी पदाच्या कालावधीपेक्षा पुढे सुरू ठेवता येणार नाही, असे स्पष्ट केले.