हत्या प्रकरणातील आरोपीस पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 13:26 IST2019-03-30T13:26:49+5:302019-03-30T13:26:57+5:30
दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या सागर चौधरीला पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे

हत्या प्रकरणातील आरोपीस पोलीस कोठडी
अकोला: जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अन्नपूर्णा माता मंदिराच्या मागे असलेल्या जंगलात एका ४५ वर्षीय इसमाची पेचकच भोसकून व दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या सागर चौधरीला पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जुने शहरातील रहिवासी सागर चौधरी याने त्याच्या नात्यातील असलेल्या संतोष पांडुरंग ठाकरे (४५) यास गुरुवारी दुपारी रेल्वे स्टेशनवरून स्वत:च्या दुचाकीने जुने शहरात अन्नपूर्णा माता मंदिरामागील गौकर्णा प्लॉटमध्ये नेले. या ठिकाणी अंधार पडल्यानंतर सागर चौधरीने संतोष ठाकरे यांच्या पोटात पेचकच भोसकला. त्यानंतर लगेच परिसरातील दगड ठाकरेच्या डोक्यात घातला. दगडाने चार ते पाच वेळा ठाकरेंच्या तोंडावर आणि दगडाने हल्ला केल्याने यामध्ये ठाक रेचा जागेवरच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संतोष ठाकरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविल्यानंतर घटनास्थळी पंचनामा केला होता. याप्रकरणी पोलिसांनी सागर चौधरी याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता आरोपी तोच असल्याचे समोर आले. त्यानंतर आरोपीस पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपीस एलसीबीचे नितीन चव्हाण, दत्ता ढोरे व शक्ती कांबळे यांनी काही तासांतच अटक केली होती.