शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

सुखद...मेळघाटात १७ हजार १८६ प्राण्यांचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 10:51 IST

अकोट, सिपना, गुगामल, मेळघाट, अकोला व पांढरकवडा अशा विभागात १७ हजार १८६ प्राण्यांचे दर्शन घडले.

- विजय शिंदेअकोट: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता वन विभागाने ‘लॉकडाउन’च्या काळात आपल्या अधिनस्त असलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने बुद्ध पौर्णिमेच्या रात्री मेळघाट व्याघ्र प्रकल्पात प्राणी गणना केली. त्यामध्ये अकोट, सिपना, गुगामल, मेळघाट, अकोला व पांढरकवडा अशा विभागात १७ हजार १८६ प्राण्यांचे दर्शन घडले. यामध्ये अकोट वन्यजीव विभागांतर्गत ३,०१६ प्राण्यांची नोंद झाली.पौर्णिमेच्या रात्री मचानवर बसून वन्य प्राण्यांची प्रगणना व निसर्गाचा आनंद घेण्याकरिता वन्यप्रेमींमध्ये उत्कंठा असते. मुंबई, पुणे, नागपूर, बंगळुरू, अमरावती व अकोला या ठिकाणांवरून वन्यप्रेमी प्राणी गणनेत सहभाग नोंदवितात; परंतु कोरोनामुळे यावर्षी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ५४६ मचानची बांधणी करण्यात आली. या मचानवर वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निदर्शनास आलेल्या प्राण्यांची नोंद घेतली. विशेष म्हणजे, या प्राणी गणनेत क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी हे स्वत: सहभागी झाले होते. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत चार वन्यजीव विभागांतील १८ वनपरिक्षेत्रात तसेच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाºया अकोला व पांढरकवडा वन्यजीव विभागातील ६ अभयारण्यांमध्ये प्राणी गणना करण्यात आली. या सर्व मचानवरून ३५ वाघ, ४० बिबट, ३४० अस्वल, १७२ रानकुत्रे, ७५२ गवे शिवाय इतर प्राणी आढळून आले. प्राणी गणनेचा निसर्ग अनुभव उपक्रम मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे राज्यात लॉकडाउन व संचारबंदी लागू आहे. अशा स्थितीत वन विभागामध्ये वन्यप्रेमींना जाण्यास परवानगी मिळाली नाही. त्यामुळे प्राणीप्रेमींना वन्य प्राणी प्रगणनेपासून पहिल्यांदाच वंचित राहावे लागले आहे.अकोट वन्यजीव विभागात ३ हजार १६ प्राण्यांचे दर्शनअकोट वन्यजीव विभागांतर्गत १४० मचान उभारले होते. या मचानावरून केलेल्या प्राणी गणनेमध्ये वाघ ४, बिबट ८, अस्वल ५३, जंगली श्वान ७४, रानगवा १८८, रानडुक्कर ४०९, सांबर २७१, चितळ १०७, बार्किंग हरीण ९५, चारसिंगी हरीण १, साळ १६, खवल्या मांजर २१, तडस ४, नीलगाय २८३, लंगुर ८९८, मुंगूस ३, जंगली मांजर ३५, रानकोंबडी १४२, कोल्हा २, जॅकल ३, ससा ७, मोर ३९१ असे एकूण ३,०१६ वन्य प्राणी आढळून आल्याची नोंद घेण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्टÑ वन विभागाने या निसर्ग अनुभव उपक्रमामध्ये वन विभागातील कर्मचारीच सहभागी होऊ शकतील, असा आदेश होता. त्यामुळे बाहेरील कोणाला सहभागी होता आले नाही. या प्राणी गणनेत मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये १७ हजार १८६ वन्य प्राण्यांची नोंद करण्यात आली. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्प हे निसर्गाच्या दृष्टीने संपन्न असून, वन्यजीवाच्या बाबतीत महत्त्वाचे केंद्र ठरत आहे.- श्रीनिवास रेड्डी, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालकमेळघाट व्याघ्र प्रकल्प.

 

टॅग्स :Melghatमेळघाटakotअकोटwildlifeवन्यजीव