शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकवर दगडफेक; पोलिसांकडून बळाचा वापर

By admin | Updated: July 18, 2015 01:49 IST

व्याळा येथे अपघातानंतर ग्रामस्थ संतप्त.

व्याळा (जि. अकोला): येथे झालेल्या अपघातानंतर ग्रामस्थांनी शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन केले. गतिरोधकाची मागणी मान्य होत नसल्याने संतप्त झालेल्या काही ग्रामस्थांनी अपघातातील ट्रकवर दगडफेक केली. दगडफेकीत ट्रकच्या चालकच्या कक्षाचे काच फुटले. यावेळी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. शुक्रवारी दुचाकीच्या धडकेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे शाखाधिकारी व रोखपाल ठार झाले. या घटनेच्यानिमित्ताने व्याळा येथील बस थांब्यावरील गतीरोधकाचा मुद्या ऐरणीवर आला आहे. अकोला ते बाळापूरदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच ठिकठिकाणच्या बस थांब्यांवर गतिरोधकही नाहीत. त्यामुळे अकोला ते बाळापूरदरम्यान अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. ५ जुलै रोजी रिधोरा आणि व्याळा येथे अपघाताच्या दोन घटना घडल्या होत्या. व्याळा येथील बस थांब्यावर एमएच-४६-एच-३0१७ या क्रमांकाचा ट्रकने दिलेल्या धडकेत गजानन किसन वाकोडे (वय ३५) हे मृत्युमुखी पडले होते. दुसरा अपघात रिधोरानजीक काचाच्या गोदामाजवळ झाला होता. या अपघातात चालक बाळू तात्या पांडव व क्लिनर विनाज अली अहेमद अली जखमी झाले होते. यापूर्वीही याच रस्त्यावर झालेल्या अपघातात राष्ट्रीयीकृत बॅँकेच्या अधिकार्‍याचा मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती मिळताच बाळापूरचे ठाणेदार मिर्झा बेग यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळावर धाव घेतली. यावेळी गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. ही मागणी पूर्ण होईपर्यंत मृतदेह हलविण्यात येणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. त्यामुळे अकोला येथून पोलिसांची जादा कुमक बोलाविण्यात आली. गतिरोधकासाठी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करण्यात येईल, असे आश्‍वासन पोलिसांनी ग्रामस्थांना दिले. सुमारे चार तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.