अकोला : पिकावर कीडनाशक फवारणी करताना पश्चिम विदर्भात ३३ च्यावर शेतमजूर, शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याने कृषी विद्यापीठ, विभागात खळबळ उडाली असून, पिकांना आवश्यक तेच कीडनाशक शास्त्रीय पद्धतीने फवारणी करण्याचे आवाहन डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केले आहे.कीटकनाशक फवारणी करताना किडींच्या नुकसानीचा प्रकार, प्रादुर्भावाची तीव्रता,आर्थिक नुकसानीची पातळी,अवस्था आणि किडींच्या तोंडाची रचना कशी आहे, यावरू न कीडनाशकांची निवड करणे क्रमप्राप्त आहे. रसशोषण करणाºया किडींच्या व्यवस्थापनाक रिता आंतरप्रवाही आणि जमिनीत वास्तव्य करणाºया किडीसाठी धुरीजन्य कीडनाशकांचीच फवारणी करावी लागते. मवाळ किडींसाठी डब्यावर हिरवा किं वा निळा त्रिकोण आहे. याच कीडनाशकांची निवड करणे गरजेचे आहे. गरज भासल्यास जहाल म्हणजे लाल, पिवळा त्रिकोण कीटकनाशक वापरावे लागते. एकाच गटांतील कीटकनाशके वारंवार फवारणी न करता आवश्यक तेव्हाच कीडनाशकांची फेरपालट करू न शिफारशीच्या मात्रा व केंद्रीय कीटकनाशक मंडळाने शिफारस केलेली कीटकनाशके फवारणी करावी. तणनाशक, बुरशीनाशक, रोगनाशक व इतर कोणतेही घटक शिफारस असल्याशिवाय मिसळून वापरू नयेत, तसेच शक्यतोवर दोन घटकांचे द्रावण फवारणीसाठी टाळलेच पाहिजे.शेतकऱ्यांनी कीटकनाशके परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावी, तसेच पक्के बिल घ्यावे. लेबल क्लेम आणि शिफारस असलेले कीटकनाशक फवारणीसाठी आवश्यक त्या प्रमाणातच खरेदी करावीत. कीटकनाशक खरेदी करताना महिती पत्रकाची मागणी विक्रेत्याकडे करावी. माहिती पत्रकावरील सूचनांचे पालन करावे.
-कीटकनाशक हाताळताना काळजी घ्या!शेतकºयांनी उन्हात तसेच वाºयाच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये, फवारणी करतेवेळी प्रथमोपचार साहित्य सोबत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. खाद्यपदार्थ, इतर औषधांशी कीडनाशकांचा संपर्क येऊ देऊ नये, कीटकनाशके लहान मुलांच्या संपर्कात येणार नाहीत, अशा गुपित किठाणी कुलूप बंद ठेवावीत, पीक, कीड व रोगनिहाय कीटकनाशकांची निवड करू न शिफारशीत प्रमाणातच फवारणीसाठी वापरावी.