जिल्हा स्त्री रुग्णालयातील रुग्ण वार्‍यावर

By Admin | Updated: September 10, 2014 01:23 IST2014-09-10T01:23:07+5:302014-09-10T01:23:07+5:30

अकोला येथील स्त्री रुग्णालयातील रुग्णांची हेळसांड; शस्त्रक्रीया झालेल्या महिलांकडे दुर्लक्ष.

The patient of the District Women Hospital wounds | जिल्हा स्त्री रुग्णालयातील रुग्ण वार्‍यावर

जिल्हा स्त्री रुग्णालयातील रुग्ण वार्‍यावर

अकोला : जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी दाखल असलेल्या रुग्णांची प्रसूती झाल्यानंतर त्यांची काळजी घेण्यात येत नसल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयात प्रसूती शस्त्रक्रिया (सिझर) झालेल्या महिलेकडे ४८ तास जातीने लक्ष देणे आवश्यक आहे; मात्र रुग्णालयातील डॉक्टरांकडून या महिला रुग्णांकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात येत असल्याने जिल्हा स्त्री रुग्णालयातील रुग्ण वार्‍यावर असल्याचे चित्र आहे. या डॉक्टरांवर वरिष्ठ अधिकार्‍यांचाही वचक नसल्याचा आरोप रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून करण्यात येत आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी रोज सुमारे ३0 ते ४0 महिला दाखल होत असून, यामधील अध्र्यावर महिलांचे सिझर करण्यात येते. सिझर झालेल्या महिलांजवळ त्यांच्या नातेवाइकांना थांबू देण्यात येत नसल्याने, या महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिला रुग्णांनी वॉर्डातील परिचारिकांना कुठल्याही वस्तूची मागणी केल्यास त्यांच्याकडे टाळाटाळ करण्यात येते. नातेवाइकांना आत येण्यात मनाई करण्यात येत असल्यामुळे रुग्णांना चहा, दूध लागल्यास त्यांच्याकडे कुठलाही पर्याय नसतो. त्यामुळे रुग्णाच्या एका नातेवाइकाला रुग्णाजवळ किंवा वॉर्डाच्या बाहेर थांबू देण्यात यावे, अशी मागणी आहे.

Web Title: The patient of the District Women Hospital wounds