शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

शिवभक्तांची वाट खडतर; शिवाजी पार्क ते अब्दुल हमीद चौकापर्यंत खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 10:00 AM

कावडधारी शिवभक्तांचा खरा कस शिवाजी पार्क ते अब्दुल हमीद चौकापर्यंत लागणार असून, या मार्गाची अक्षरश: चाळण झाल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: येत्या २६ आॅगस्ट रोजी शहरात मोठ्या उत्साहात कावड व पालखी उत्सव साजरा केला जाणार आहे. त्या पृष्ठभूमीवर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित कंत्राटदाराला अकोला ते गांधीग्रामपर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २० आॅगस्टची मुदत दिली होती. ही मुदत उलटून गेल्यावरही गांधीग्रामपर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती सुरूच असल्याचे बुधवारी पाहावयास मिळाले. हा प्रकार कमी म्हणून की काय, कावडधारी शिवभक्तांचा खरा कस शिवाजी पार्क ते अब्दुल हमीद चौकापर्यंत लागणार असून, या मार्गाची अक्षरश: चाळण झाल्याचे चित्र आहे.शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वरला श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी गांधीग्राम येथून पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्याची परंपरा आहे. गांधीग्रामला असंख्य कावडधारी शिवभक्त नदीचे जल आणण्यासाठी रविवारी सायंकाळी रवाना होतात. सोमवारी सकाळी अनवाणी पायी चालत शिवभक्त शहरात दाखल होतात. मागील दोन वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)च्यावतीने अकोला ते अकोट मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात अकोला ते गांधीग्रामपर्यंतचा रस्ता तयार केला जात आहे; परंतु अद्यापही रस्त्याचे काम पूर्णत्वास न गेल्यामुळे कावड व पालखी उत्सवात सहभागी होणाऱ्या शिवभक्तांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. कंत्राटदाराकडून रस्ता दुरुस्तीला विलंब होत असल्याची बाब ध्यानात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गांधीग्रामपर्यंतच्या रस्त्याची पाहणी करून २० आॅगस्टपर्यंत रस्ता दुरुस्तीचे निर्देश दिले होते. ही मुदत संपल्यानंतरही कंत्राटदाराकडून रस्त्याची दुरुस्ती सुरूच असल्याचे दिसून आले.

रस्त्यावर थातूरमातूर ‘पॅचिंग’शिवाजी पार्क ते अब्दुल हमीद चौकापर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. बुधवारी खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. रस्त्याचे पॅचिंग अतिशय सुमार दर्जाचे असल्यामुळे त्यातील गिट्टीचे बारीक खडे शिवभक्तांसाठी अधिकच त्रासदायक ठरणार आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका