शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

कांदे, बटाटे जीवनावश्यक कायद्यात नको

By admin | Updated: July 12, 2014 01:52 IST

‘लोकमत’च्या परिचर्चेत केंद्र शासनाच्या निर्णयाला सर्व स्तरातून विरोध.

अकोला : कांदे आणि बटाटे हे दैनंदिन जीवनात उपयोगात आणले जात असले तरी हे दोन्ही पदार्थ नसले तर फारसे अडत नाही. त्यामुळे कांदे आणि बटाटे यांना जीवनावश्यक कायद्यात टाकण्याची फारशी गरज नाही. यापेक्षा साठेबाजीवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे. यामुळे भावावर नियंत्रण राहील आणि शेतकर्‍यांना नुकसान सोसावे लागणार नाही, असे मत शुक्रवारी ह्यलोकमतह्णच्या परिचर्चेत कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी व शेतकरी संघटनेचे नेते यांनी व्यक्त केले. ह्यलोकमतह्णच्यावतीने शुक्रवारी ह्यकेंद्र शासनाने कांदे व बटाटे यांना एपीएमसी अँक्टमधून वगळून जीवनावश्यक करण्याचा घेतलेला निर्णय योग्य की चूकह्ण या विषयावर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या परिचर्चेत कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी विशेष कार्यकारी अधिकारी शं.ना. बेंडे, माजी सभापती शिरीष धोत्रे, सामाजिक कार्यकर्ते महादेवराव भुईभार, अँड. रामसिंग राजपूत, काँग्रेस किसान सेलेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, महाराष्ट्र कृषक समाजाचे चेअरमन प्रकाश मानकर, शेतकरी संघटनेचे नेते ललित बहाळे, कांदे-बटाटे व्यावसायिक गणेश पवित्रकार आदी सहभागी झाले होते. सर्वच वक्त्यांनी कांदे बटाट्यांना जीवनावश्यक कायद्यात सहभागी करण्याची आवश्यकता नसल्याचे मत मांडले. कांदा आणि बटाट्यांचा उपयोग दैनंदिन जीवनात मोठय़ात प्रमाणात होऊ लागला आहे. तरीदेखील कांदे व बटाटे न खाल्ल्यामुळे काही नुकसान होते असे नाही. हे पदार्थ नाही खाल्ले तरी चालतात. त्यामुळे इतर महत्त्वाच्या पदार्थांना सोडून कांदे, बटाट्यांना जीवनावश्यक कायद्यात बसविणे चुकीचे ठरेल, असे मत वक्त्यांनी मांडले. बटाट्यांवर प्रक्रिया करून जे पदार्थ तयार केले जातात ते अव्वाच्या सव्वा भावात विकले जातात. त्याबद्दल कोणाचीच ओरड नसते. बटाटे आणि कांद्यांच्या किंमती थोड्याशा वाढल्या तर ओरड सुरू झाली. यापेक्षा इतर भाज्या कितीतरी महाग आहेत; परंतु त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. केवळ व्यापार्‍यांचा विचार करून शासन निर्णय घेत आहे. शेतकर्‍यांना कृषि उत्पन्न बाजार समितीचा आधार आहे.बाजार समिती नसेल तर शेतकर्‍यांची लूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापेक्षा साठेबाजांवर शासनाने नियंत्रण आणावे, असा विचार वक्त्यांनी मांडला. शेतीमध्ये एफडीआय आणावे, असा विचारदेखील काही वक्त्यांनी बोलून दाखविला. एकूणच कांदे व बटाटे जीवनावश्यक कायद्यात घालू नये, असा विचार वक्त्यांनी बोलून दाखविला.