शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

एक होतं गाव..

By admin | Updated: September 8, 2014 01:10 IST

विकासाअभावी गाव झालं उजाड; तेल्हारा तालुक्यातील कळमखेड झालं एका व्यक्तीचं गाव.

सदानंद खारोडे/ तेल्हाराकधीकाळी संपन्न असलेलं तेल्हारा तालुक्यातील एक लहानसं गाव पार उजाड झालं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात या गावाकडे प्रशासनाने लक्षच दिले नाही. त्यामुळे गावाचा विकास होऊ शकला नाही. परिस्थिती एवढी बिकट झाली की, अख्ख गावंच उजाड झालं. ग्रामस्थांना या गावातून स्थलांतर करणे भाग पडले. आजमितीस या गावात केवळ एकच व्यक्ती वास्तव्य आहे. या एका ग्रामस्थासाठी शासनानं स्वतंत्र पोलिस पाटील नेमण्याची कृपा केली, एवढं मात्र खरं.सातपुड्याच्या जवळच शेतकरी व शेतमजुरांच्या ५0 कुटुंबांचा समावेश असलेल्या कळमखेड गावात हिंदू-मुस्लिम गुण्यागोंविदाने राहायचे. सामाजिक एकतेचे प्रतिक असलेल्या या गावात दोन्ही धर्मियांची धर्मस्थळं आहेत. गावातील घरांची पडझड झाली आहे. विहिरी खचल्या असून, केवळ दोन घरं कशीबशी तग धरून आहेत. गावात दूषित पाणी पुरविणारी, एक कूपनलिका आहे. गावात आजपर्यंत कोणताही शासकीय अधिकारी पोहोचला नाही. रस्ता, पथदिवे, शौचालय नाही; शाळा, आरोग्य केंद्र आणि समाजमंदिर तर दूरच राहिले. आजूबाजुचा ३६ एकर परिसर काटेरी झाडाझुडपांनी व्यापला आहे. गावात रस्ताच नसल्याने, गावकर्‍यांनी १९७२ साली मातीचा भराव टाकून दोन किलोमीटर लांबीचा रस्ता तयार केला हो ता; परंतु त्यानंतर साधा रस्ताही कुणी केला नाही. त्यामुळे विवाह समारंभाकरीताही गावामध्ये पाहुणे येण्यास टाळाटाळ करायचे. त्यामुळे गावाची अवस्था हळुहळू आणखी बकाल झाली. कालांतराने येथील गावकर्‍यांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. तळेगाव बाजारपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असल्याने, काही गावकरी तळेगाव बाजार, काही खंडाळा, तर काही अकोली येथे राहण्यास गेले; मात्र त्यांची घरं अद्यापही कळमखेड येथे कायम आहेत. गाव उजाड असलं तरी, शासनाने इथे वर्षा बोदडे नामक पोलिस पाटील नेमला आहे. गावात सध्या केवळ प्रल्हाद बोदडे नामक ग्रामस्थ वास्तव्यास असून, तोच या गावाची रखवाली करीत आहे. एक ना एक दिवस विकासाची गंगा गावात येईल, या आशेने गावाची वेस ओलांडण्याचे तो टाळत आहे. येथून स्थलांतर केलेल्या ग्रामस्थांनी, नव्या गावची मतदान ओळखपत्रे बनविली आहेत; मात्र ७ गावकर्‍यांची ओळखपत्र अद्यापही कळमखेडच्या नावानेच आहेत. ह्यगड्या आपला गाव बराह्ण असे म्हणत विकासाचा सूर्य कधी ना कधी उगवेल, अशी आशा त्यांनाही आहे. अकोली रूपराव येथील सरपंच जनार्दन ढोकणे यानीकळमखेड गावात सध्या एकच रहिवासी असल्याने, या गावात विकासाची कोणतीही कामे केली जात नसल्याचे सांगत गावाची लोकसंख्या वाढल्यास, विकासाला प्राधान्य दिले जाईल, असे म्हणाले. तर तेल्हारा येथील तहसीलदार यांनी तहसील कार्यालयाच्या दफ्तरी कळमखेड गावांची उजाड म्हणून नोंद नाही; परंतु या गावाला भेट देऊन माहिती अवगत करू. येथील समस्या सोडविण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे अहवालही पाठवू, असे सांगीतले. ** प्रत्येक निवडणुकीत मतदान निवडणुकीच्या काळात गावात पुढार्‍यांच्या, अधिकार्‍यांच्या गाड्या पोहचतात. आश्‍वासनांची खैरात वाटली जाते, त्यानंतर एकदाची निवडणूक संपली, की मग कुणीही गावाकडे वळून पाहत नाही. याच कारणामुळे गावकरी लगतच्या गावांमध्ये वास्तव्यास गेले आहेत. गावाची ओढ असलेल्या प्रत्येकाजवळ याच गावचे मतदान ओळखपत्र आहे. ते प्रत्येक निवडणुकीत मतदानासाठी गावात आवर्जून येतात.