शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात एकाचा मृत्यू; ८० पॉझिटिव्ह, ६१ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 18:21 IST

रविवार, २७ सप्टेंबर रोजी बोरगाव मंजु येथील एक कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २२५ वर गेला.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून , रविवार, २७ सप्टेंबर रोजी बोरगाव मंजु येथील एक कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २२५ वर गेला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ८० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७१८८ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३८७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ८० अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३०७ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये मूर्तिजापूर येथील १३ जणांसह अकोट येथील सात, छोटी उमरी, डाबकी रोड व बाळापूर येथील प्रत्येकी तीन, मलकापूर, मोठी उमरी, बोरगाव मंजू, जीएमसी, शास्त्रीनगर व ओझोन येथील प्रत्येकी दोन, जोगळेकर प्लॉट, हिंगणा रोड, श्रीवास्तव चौक, डोंगरगाव, गजानन नगर, नानक नगर, कोठारी वाटिका, पत्रकार कॉलनी ,जुने शहर, पाथर्डी अकोट , वरुर, कुटासा, शिवापुर, कान्हेरी, रंजना नगर, आदर्श कॉलनी, सिंधी कॅम्प, देशमुख फाईल येथील प्रत्येकी रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळच्या अहवालांमध्ये शास्त्री नगर येथील चार, खडकी, कौलखेड, गांधीग्राम व बार्शीटाकळी येथील दोन, कान्हेरी सरप, तुकाराम चौक, लेबर कॉलनी जूने तारफैल, खडकी, रामनगर, पिंपरी खु., वाशिम बायपास, मोठी उमरी व रतनलाल प्लॉट येथील प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.बोरगाव मंजू येथील महिलेचा मृत्यूशनिवारी बोरगांव मंजू येथील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या महिलेस २४ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.६१ जणांना डिस्चार्जशासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ३१, कोविड केअर सेंटर, अकोला येथून १६, युनिक हॉस्पीटल येथून एक, आयुर्वेदीक महाविद्यालय येथून पाच, हॉटेल स्कायलार्क येथून दोन, तर कोविड केअर सेंटर बार्शिटाकळी येथून सहा अशा एकूण ६१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.१,५३१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,१८८ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ५४३२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २२५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,५३१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या