शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव द्या!

By admin | Updated: January 3, 2015 01:28 IST

विभागीय आयुक्तांचे निर्देश: लोकप्रतिनिधी-अधिका-यांची बैठक.

अकोला: पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर अकोला शहरासाठी मोर्णा धरण ते महान येथील जलशुद्धीकरण केंद्र आणि महान ते खांबोरा आणि चोहोट्टा बाजार ते घुसर जलवाहिनी टाकणे, या तीन पाणीपुरवठा योजनांचे सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर यांनी शुक्रवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला शुक्रवारी दिले. पाणीटंचाई योजनांच्या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी अधिकार्‍यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार संजय धोत्रे, आ.रणधीर सावरकर, आ.हरीश पिंपळे, आ.बळीराम सिरस्कार, महापौर उज्ज्वला देशमुख, जिल्हाधिकारी अरुण शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता (ठाणे) हेमंत लांडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे, अपर जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त शिवाजी दिवेकर, मजीप्राचे अधीक्षक अभियंता गणेश गोखले, कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपूलवार प्रामुख्याने उपस्थित होते. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध नसल्याने, शहरासह जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पृष्ठभूमीवर अकोला शहराला मोर्णा धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी मोर्णा धरण ते महान येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्याची २७ कोटींची आकस्मिक योजना, तसेच खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांसह मूर्तिजापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणापासून खांबोरापर्यंत जलवाहिनी टाकण्याची २४ कोटींची योजना आणि खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ४४ गावांना पाणीपुरवठय़ासाठी चोहोट्टा बाजार ते घुसरपर्यंत जलवाहिनी टाकण्याची ५ कोटी ४९ लाखांची योजना या तीन पाणीपुरवठा योजनांचे सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. त्यामध्ये महान ते खांबोरा आणि मोर्णा धरण ते महान या दोन योजनांचा नवीन प्रस्ताव राज्य शासनाकडे तर खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत चोहोट्टा बाजार ते घुसर योजनेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्याच्या सूचना राजूरकर यांनी मजीप्राच्या अधिकार्‍यांना दिल्या. जिल्ह्यातील प्रस्तावित पाणीपुरवठा योजनांबाबत विभागीय आयुक्तांनी उपस्थित लोकप्रतिनिधींसोबत चर्चा केली.