शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

जलजन्य आजारांच्या उद्रेकाचे प्रमाण घटले!

By admin | Updated: June 17, 2015 02:11 IST

आरोग्यविषयक दक्षता वाढली; साथरोगांमुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण घटले.

अकोला: पाण्यापासून पसरणार्‍या रोगांचा उद्रेक होण्याचे प्रमाण राज्यात अध्र्यावर आले आहे. गत तीन वर्षात आरोग्य विभागाने राबविलेल्या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम पुढे आले असून, लोकांमध्येही स्वच्छतेबाबतची दक्षता वाढल्याने जलजन्य आजारांपासून होणार्‍या मृत्यूचे प्रमाण घटत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जलजन्य आजारांचा उद्रेक थांबविण्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. यात दूषित पाण्याचे स्रोत शोधणे, पाण्यात ब्लिचिंग पावडरचा वापर वाढविणे, आरोग्यविषयक जनजागृती शेवटच्या घटकापर्यंत करणे आणि उद्रेक झालाच तर पुरेशा प्रमाणात औषधांचा पुरवठा होईल याकडे लक्ष दिले जात आहे. परिणामी तीन वर्षात राज्यात जलजन्य आजारांच्या उद्रेकाचे प्रमाण घटले आहे. गॅस्ट्रो, तीव्र अतिसार, कॉलरा, कावीळ, लेप्टोपायरोसिस यासारख्या आजारांची लागण दूषित पाण्यामुळे होते. राज्यात २0१२ मध्ये वर्षभरात जलजन्य आजारांचा ११६२८ ठिकाणी उद्रेक झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. त्यानंतर २0१३ मध्ये ३७६१ ठिकाणी उद्रेक झाला होता. हे प्रमाण २0१४ मध्ये अध्र्यावर आले आहे. २0१४ मध्ये ११४८ ठिकाणी जलजन्य आजारांचा उद्रेक झाला होता. अतिसाराची लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ टायफाईड होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. पावसाळ्य़ात या आजारांची लागण अधिक होत असल्याने यावर्षी आरोग्य विभागातर्फे आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आले आहेत. *दूषित पाण्याच्या स्रोतात अकोला आघाडीवरराज्यातील दूषित पाण्याचे स्रोत शोधून तेथील पाणी पिण्यासाठी वापरले जाणार नाही, याबाबत काळजी घेतली जात आहे. शिवाय या स्रोतातील पाणी शुद्ध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे. ज्या ग्रामपंचायतींकडून दूषित पाण्याच्या स्रोताबाबत काळजी घेतली जात नाही, त्यांना आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. असे असतानाही दूषित पाण्यासाठी रेड कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतींची संख्या अकोल्यात सर्वाधिक आहे. दूषित पाण्याच्या स्रोतांचे प्रमाण अधिक असलेल्या आघाडीच्या पाच जिल्ह्यात अकोल्याचा क्रम पहिला आहे. अकोला जिल्ह्यातील १३.६५ टक्के ग्रामपंचायतींच्या हद्दीत दूषित पाणी आहे. त्यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यात ८.३७ टक्के, गडचिरोली ५.५७ टक्के गोंदिया ३.७८ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ३.३८ टक्के ग्रामपंचायतींच्या हद्दीत दूषित पाण्याचे स्रोत आहेत.