शहरं
Join us  
Trending Stories
1
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
4
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
5
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
6
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
7
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
8
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
9
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
10
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
11
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
12
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
13
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
14
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
15
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
16
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
17
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
18
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
19
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
20
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

रोपवाटिकांमधून आता रोपांचे मोफत वाटप!

By admin | Updated: July 23, 2014 00:32 IST

सामाजिक वनीकरणचा उपक्रम: शाळा, सामाजिक संस्थांना मिळणार लाभ

खामगाव : सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकांमध्ये पडून असलेल्या रोपांच्या विक्रीला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने, शासनाने ही रोपं शाळा तसेच सामाजिक संस्थांना मोफत वाटण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरणप्रेमींकडून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.
पर्यावरणाचा दिवसेंदिवस होणारा र्‍हास घातक असून, त्यादृष्टीने वृक्षारोपणास शासनस्तरावर विशेष महत्व दिले जाते. त्याचे सकारात्मक परिणाम दिसत असून, वृक्षारोपणास चळवळीचे स्वरूप प्राप्त होत आहे. वृक्षारोपणास प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनाकडून भर दिला जातो; मात्र २0१२ साली राज्यात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाल्याने, सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकांमधून वृक्षांचा विनियोग झाला नव्हता.
त्यामुळे आतापर्यंत सामाजिक वनीकरण विभागाच्या राज्यातील रोपवाटिकांमध्ये १.२९ कोटी रोपं पडून होती.
एकीकडे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात रोपं पडून असताना, केवळ कुशल खर्च निघावा म्हणून शासनाने यावर्षी रोप विक्रीचा निर्णय घेतला होता. रोप खरेदीसाठी अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने, महाराष्ट्र ग्राम रोजगोर हमी योजनेंतर्गत २0१४ च्या पावसाळ्यात लागवडीनंतर शिल्लक राहिलेल्या रोपांचे मोफत वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी केंद्र तथा राज्य शासनाच्या काही विभागांची मदत घेतली जाणार आहे.

** वृक्ष जगविण्यासाठी बंधपत्र
सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेतून रोपं घेणार्‍यांना रोपाची लागवड आणि संवर्धनाबाबत बंधपत्र भरुन द्यावे लागणार आहे. या बंधपत्रामुळे वृक्षसंवर्धनात भर पडण्यास मदत होणार आहे.

** रोपांची किंमत कमी
रोपांचे मोफत वाटप करण्यासाठी शासनाने काही अटी आणि शर्ती निश्‍चित केल्या आहेत. त्यामुळे सर्वच रोपांचे मोफत वाटप शक्य नसून, काही रोपांची विक्रीही केली जाणार आहे. त्यासाठी शासनाने रोपांच्या किमती कमी केल्या आहेत. त्यानुसार ९ महिने वयोमानाचे दीड ते दोन फूट उंचीचे रोप प्रतिनग ८ रुपयांऐवजी १ रुपया तर १८ महिने वयोमानाचे ४ ते ५ फूट उंचीचे रोप प्रतिनग ४१ ऐवजी १0 रुपये या दराने विक्री होणार आहे.