शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नवे आमदार निधीविना!

By admin | Updated: December 9, 2014 00:41 IST

पाचही आमदारांनी निवडणुकीपूर्वीच खर्च केला निधी; भारसाकळे यांच्यासाठी ३ हजार तर सावरकर यांच्यासाठी उरले ४0 हजार.

विवेक चांदूरकर /अकोलासन २0१४ व १५ या आर्थिक वर्षाकरिता विधानसभा मतदारसंघासाठी आलेला आमदार निधी जिल्ह्यातील पाचही आमदारांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच खर्च केल्यामुळे नवनिर्वाचित आमदारांना मार्च २0१५ पर्यंत खर्च करण्यासाठी निधीच शिल्लक उरला नाही. आकोट व अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात विजयी झालेल्या नव्या आमदारांनाही याचा फटका बसला असून, पूर्वीच्या आमदारांनी निधी खर्च केल्यामुळे त्यांना आमदारनिधीसाठी मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. राज्यातील विधानसभा मतदारसंघात विकासकामे करण्याकरिता दरवर्षी मार्च ते मार्च या आर्थिक वर्षासाठी दोन कोटी रुपयांचा आमदारनिधी आमदारांना दिला जातो. पाच वर्षांसाठी एकूण दहा कोटींचा निधी दिल्या जातो. यावर्षी विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे मावळत्या आमदारांनी निवडणुकीपूर्वीच संपूर्ण निधी खर्च केला. शासनाच्यावतीने आमदारनिधी मतदारसंघासाठी एका आर्थिक वर्षाकरिता दिल्या जातो. त्यामुळे नव्या आमदारांना मार्च महिन्यापर्यंत आगामी चार महिने मतदारसंघात खर्च करण्यासाठी निधीच नाही आहे. अकोला जिल्ह्यातील पाचही आमदारांनी प्रशासकीय मान्यतेसाठी निधी खर्च केला असून, सर्वात जास्त म्हणजे ४0 हजार रुपये अकोला पूर्वसाठी शिल्लक आहेत. मावळत्या आमदारांनी निवडणुकीनंतरच्या अध्र्या वर्षासाठी निधी ठेवला नाही. सध्या जिल्ह्यात दुष्काळ पडला असून, पाणीटंचाईचे भीषण संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे आमदारांना विकास तर दूरच समस्या सोडविण्याकरिताच निधीची गरज भासणार आहे. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात सन २0१४-१५ मध्ये खर्च करण्यासाठी १ कोटी ४३ लाख रुपये आले होते. यावर्षीच्या २ कोटी आमदारनिधीपैकी ५५ लाख ६१ हजार माजी आमदार हरिदास भदे यांनी २0१३- १४ मध्येच खर्च केले होते. भदे यांनी १ कोटी ४३ लाख ९९ हजार विधानसभा निवडणुकीपूर्वीच खर्च केले. तर अकोला पूर्व मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रणधीर सावरकर यांच्यासाठी आता केवळ ४0 हजार १0 रुपयेच शिल्लक आहेत. तसेच आकोट मतदारसंघात माजी आमदार संजय गावंडे यांनी ६२ लाख २२ हजार रुपये खर्च केले. ७५ लाख ५२ हजार रुपये त्यांनी गतवर्षीच खर्च केले होते. यावर्षीसाठी आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याकरिता केवळ ३ हजार ६८0 रुपये शिल्लक आहेत. यासोबतच बाळापूर, मूर्तिजापूर व अकोला पश्‍चिम मतदारसंघातही हीच गत आहे.