शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘नवोदय’च्या विद्यार्थी संसदसाठी २१ उमेदवार विजयी

By admin | Updated: August 27, 2015 00:53 IST

शुक्रवारी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांची निवड.

अकोला : शहरानजीक असलेल्या बाभूळगाव येथील नवोदय विद्यालयात विद्यार्थी संसद (शालेय मंत्रिमंडळ) गठित करण्यासाठी बुधवारी मतदान घेण्यात आले. मतमोजणीनंतर दुपारी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये विद्यार्थी संसद प्रतिनिधी म्हणून २१ विद्यार्थी उमेदवार विजयी झाले. निवडून आलेल्या विद्यार्थी संसद प्रतिनिधींमधून मंत्री आणि मुख्यमंत्र्यांची निवड शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना लोकशाहीचे धडे देण्यासाठी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी संसद गठित करण्यात येत आहे. त्यासाठी २४ विद्यार्थी संसद प्रतिनिधींची निवड करण्याकरिता निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये तीन विद्यार्थी उमेदवारांची अविरोध निवड झाल्याने, २१ विद्यार्थी प्रतिनिधींसाठी ६0 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. २१ विद्यार्थी प्रतिनिधी पदांसाठी बुधवारी सकाळी १0 ते दुपारी १ वाजेपर्यंत नवोदय विद्यालयात मतदान घेण्यात आले. प्रभात किड्स स्कूलच्या योग धारस्कर व राम घोंगडे या विद्यार्थ्यांंनी विकसित केलेल्या सॉफ्टवेअरद्वारे ऑनलाइन आणि मतपत्रिकेवर शिक्के मारून पारंपरिक पद्धतीने मतदान घेण्यात आले. ४४४ विद्यार्थी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर लगेच मतमोजणी करण्यात आली व दुपारी निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. त्यामध्ये २१ विद्यार्थी उमेदवार विजयी झाले. मतदान प्रक्रियेदरम्यान जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, उपविभागीय अधिकारी संजय खडसे तसेच निवडणूक निर्णय अधिकारी प्रतीक्षा तेजनकर यांनी नवोदय विद्यालयात मतदार विद्यार्थ्यांसोबत निवडणुकीसंबंधी चर्चा केली. विद्यार्थी संसद प्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या विद्यार्थ्यांंमधून २८ ऑगस्ट रोजी १0 मंत्री आणि शालेय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत निवडून आलेल्या प्रतिनिधींची बैठक बोलाविण्यात आली आहे. विद्यार्थी संसदेच्या मंत्रिमंडळ तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधीदेखील २८ ऑगस्ट रोजी होणार आहे.