शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेची लवकरच पाेटनिवडणूक ; निवडणूक आयाेगाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:20 IST

काेराेनाचा संसर्ग टाळण्यासाठी महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असतानाच अनेक नगरसेवकांनी जनजागृतीसाठी पुढाकार घेतल्याचे चित्र हाेते. काेराेनाशी लढा देत ...

काेराेनाचा संसर्ग टाळण्यासाठी महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असतानाच अनेक नगरसेवकांनी जनजागृतीसाठी पुढाकार घेतल्याचे चित्र हाेते. काेराेनाशी लढा देत असतानाच अनेकांचा मृत्यू झाला. दरम्यान, या कालावधीत प्रभाग क्रमांक ३ मधील वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेविका ॲड. धनश्री देव, प्रभाग ४ मधील भाजपचे नगरसेवक संताेष शेगाेकार तसेच प्रभाग ८ मधील भाजपच्या नगरसेविका नंदा पाटील यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनामुळे तीन नगरसेवक पद रिक्त झाले असून या ठिकाणी पाेटनिवडणूक हाेणार किंवा नाही, याकडे अनेकांचे लक्ष लागले हाेते. अखेर राज्य निवडणूक आयाेगाने अकाेला महापालिकेसह राज्यातील इतर १६ महापालिकांमधील नगरसेवकांच्या २५ रिक्त पदांसाठी पाेटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

१५ जानेवारीपर्यंतची मतदार यादी ग्राह्य

पाेटनिवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२१ पर्यंत अद्ययावत केलेली विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार यादीच्या आधारे प्रभागनिहाय मतदारांचे विभाजन केले जाणार आहे.

असा आहे मतदार यादीचा कालबध्द कार्र्यक्रम

प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी तयार करणे- १६ फेब्रुवारी

मतदार यादीवर हरकती व सूचना- १६ ते २३ फेब्रुवारी

अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणे- ३ मार्च

मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द करणे- ८ मार्च

प्रभाग निहाय व मतदान केंद्र निहाय अंतिम यादी प्रसिध्द करणे- १२ मार्च

एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणूक

राज्य निवडणूक आयाेगाच्या निर्देशानुसार एप्रिल किंवा मे महिन्यात पाेटनिवडणूक पार पडणार आहे. अर्थात निवडणुकीसाठी तीन महिन्यांचा कालावधी लक्षात घेता इच्छुकांना तयारीसाठी बराच अवधी मिळणार असल्याचे दिसून येत आहे.