शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: देशासमोरील संकट गंभीर, पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी- शरद पवार
3
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
4
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
5
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
6
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
7
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
8
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
9
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
10
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
11
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
12
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
13
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
14
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
15
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
16
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
17
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
18
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
19
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
20
Motorola Razr Fold भारतात लॉन्च; १.७० लाखांचा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आवारात कचरा टाकणे पडणार महागात

By admin | Updated: June 18, 2014 00:59 IST

राष्ट्रवादीचे आंदोलन; प्रशासन पोलिस तक्रार करण्याच्या तयारीत

अकोला : शहरात सर्वत्र पसरलेली घाण व अशुद्ध पाणी पुरवठ्याच्या मुद्यावर मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने मनपा प्रशासनाच्या निषेधार्थ आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या कार्यालयासमोर कचरा टाकण्यात आला. हा कचरा टाकणे राष्ट्रवादीला महागात पडण्याची शक्यता असून, याप्रकरणी पोलिस तक्रार करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्याची माहिती आहे.
महापालिकेचे नियोजन पुरते ढेपाळले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहराच्या कानाकोपर्‍यात घाण व कचर्‍याचे ढीग साचले आहेत. अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाल्याचा मुद्दा उपस्थित करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने प्रशासनाच्या निषेधार्थ आयुक्तांच्या कार्यालयासमोर कचरा टाक ण्यात आला. निवेदन घेण्यासाठी आयुक्त उपस्थित नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात नारेबाजी केली. प्रभारी उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाणे हजर नसल्यामुळे उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी माजी स्थायी समिती सभापती पप्पू शर्मा, नितीन झापर्डे, बुढन गाडेकर, संदीप बाथो, देवानंद राऊत, युवराज फोकमारे, गोविंद पांडे, अमोल अवचार, मंगेश चोपडे, सचिन पाटील, आशीष शिरसाट, अश्विन दाते,पवन भिरड, राहुल कोरपे, मुन्ना पांडे, जगदीश देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

**  पोलिस तक्रार होणार?
मनपा आवारात आंदोलन करून घाण व कचरा टाकणार्‍या राकाँच्या आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिस तक्रार करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. एकीकडे पोलिसात तक्रार करण्याचे निर्देश द्यायचे अन् दुसरीकडे राकाँच्या काही पदाधिकार्‍यांना बुधवारी सकाळी चर्चेसाठी बोलवायचे,अशी विचित्र भूमिका प्रशासनाने घेतल्याची माहिती आहे.