शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

मनपा प्रशासनाने बाजोरिया मैदानाची जागा ताब्‍यात घ्यावी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:18 IST

अकोला : जनता भाजी बाजारालगतच्या बाजोरिया मैदानावर महापालिकेच्या सांस्‍कृतिक भवनाचे आरक्षण आहे. त्यामुळे मनपाने जिल्हा प्रशासनाकडे जागेच्या मूल्‍यांकन रकमेचा ...

अकोला : जनता भाजी बाजारालगतच्या बाजोरिया मैदानावर महापालिकेच्या सांस्‍कृतिक भवनाचे आरक्षण आहे. त्यामुळे मनपाने जिल्हा प्रशासनाकडे जागेच्या मूल्‍यांकन रकमेचा भरणा करून ही जागा तातडीने ताब्यात घ्यावी, अशी मागणी भाजपचे महानगर अध्यक्ष तथा माजी महापौर विजय अग्रवाल यांनी मंगळवारी केली.

महानगरपालिकेने मुंगीलाल बाजोरिया नावाने ओळखल्‍या जाणारी जागा ताब्‍यात घेण्‍याबाबतचा परिपूर्ण प्रस्‍ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केेला होता. त्‍यानुसार जिल्‍हाधिकाऱ्यांनी या जागेचा आगाऊ ताबा मनपा प्रशासनाला दिला आहे. यापूर्वी मनपाने जनता भाजीबाजार व जुने बसस्‍थानकाच्या जागेची मूल्यांकन रक्‍कम जिल्हा प्रशासनाकडे जमा केली आहे. यादरम्यान, आरक्षित बाजोरिया मैदानाच्या जागेची मूल्यांकन रक्‍कम मनपाने तातडीने जमा करण्याची आवश्यकता आहे. ही रक्कम जमा करून मनपा प्रशासनाने सदर जागेचा ताबा घ्यावा, अशी मागणी भाजपचे महानगराध्यक्ष तथा माजी महापौर विजय अग्रवाल यांनी केली आहे.

संस्थाचालकांचा अर्ज खारिज

मुंगीलाल बाजोरिया मैदानाच्या जागेवर मनपाचे आरक्षण आहे. या संदर्भात सदर शाळेच्या संचालक मंडळाने मनपा प्रशासनाच्या विरोधात जिल्‍हाधिकारी व विभागीय आयुक्‍त अमरावती यांच्‍याकडे सदर जागा संस्‍थेला देण्‍याकरिता अर्ज दिला होता. सदर अर्ज दोन्‍ही ठिकाणी खारीज झाला आहे. तसेच या संदर्भात शासनाकडे अर्ज दाखल केला असला तरी त्‍यामध्‍ये शासनाकडून कोणतेही निर्देश नसल्याची माहिती विजय अग्रवाल यांनी दिली.