शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

श्री ढोकेश्‍वर अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या शाखेला  टाळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:49 IST

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर शहरातील स्टेशन विभागातील जयस्तंभ  चौकमधील प्रशस्त जागेत गेल्या ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या  श्री ढोकेश्‍वर मल्टी स्टेट अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीला  अखेर टाळे लागले. त्यामुळे, शहरासह तालुक्यातील ठेवीदारांचे  ४0 लाख अडकले आहेत. 

ठळक मुद्देमूर्तिजापूर शहरातील ठेवीदारांचे ४0 लाख  अडकले!ऑक्टोबरमध्ये सुरू झाली होती क्रेडिट सोसायटी

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : मूर्तिजापूर शहरातील स्टेशन विभागातील जयस्तंभ  चौकमधील प्रशस्त जागेत गेल्या ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या  श्री ढोकेश्‍वर मल्टी स्टेट अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीला  अखेर टाळे लागले. त्यामुळे, शहरासह तालुक्यातील ठेवीदारांचे  ४0 लाख अडकले आहेत.  नाशिक येथील मुख्य कार्यालय असलेल्या या संस्थेने संपूर्ण  विदर्भासह इतर ठिकाणी आपले जाळे पसरविणे सुरू केले.  विविध आमिषे देऊन व मोठय़ा व्याज दराचे प्रलोभन देऊन  ढोकेश्‍वर अर्बनच्या शाखेचे थाटात उद्घाटन करून ठेवी घेणे  सुरू केले. ऑक्टोबर २0१६ मध्ये सुरू झालेल्या मूर्तिजापूर  शाखेनेसुद्धा सर्वसामान्यांकडून प्रलोभन दाखवून ठेवी घेणे सुरू  केले. प्रशस्त इमारत व इन्टिरियल डेकोरेशन बघून, मूर्तिजा पूरच्या भोळ्या जनतेने लालसेपोटी आपल्या ठेवी ठेवल्या.  बँकेचे व्यवस्थापक यांनीसुद्धा आपली घामाची रक्कम व्याजाच्या  लालसेपोटी बँकेत ठेवली; परंतु इतर ठिकाणी सुरू असलेली  कुजबुज व्यवस्थापकाच्या कानी पडताच त्यांनी स्वत:च्या जमा  असलेल्या रकमेवर कर्ज काढून स्वत: सुरक्षित राहिले.  मिळालेल्या माहितीनुसार याच संस्थेच्या याच पतसंस्थेच्या  जवळपास नऊ शाखा पोलिसांनी सील केल्या. ३0 च्या जवळ पास शाखा बंद पडल्या. नजीकच्या दर्यापूर शाखेतसुद्धा दोन  कोटी रुपयांच्या जवळपास रक्कम अडकून पडल्याची माहिती  आहे. या संस्थेचे पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक (एम.डी.) सं तोष पोपटराव काळे हे सध्या कारागृहात आहेत. सदर शाखेत  जमा असलेली रक्कम ही अकोला येथे शाखेत जमा करण्यात  आली आहे.  गेल्या पंधरा दिवसांपासून शाखेला टाळे  लागल्यामुळे लोकांना शंका आली व लोकांनी स्वत:च्या जमा  असलेल्या रकमेकरिता चकरा मारणे सुरू केले आहे. मूर्तिजा पूरवासीयांचा हा आकडा ५0 लाखांपर्यंत असल्याची माहिती  आहे. या मोबदल्यात फक्त साडेसात हजारांचे कर्ज वाटप आहे.