तेल्हारा खरेदी-विक्री संस्थेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:14 IST2021-02-05T06:14:46+5:302021-02-05T06:14:46+5:30

खरेदी विक्री संस्थेमधील संचालकांचा अंतर्गत वाद हा अनेकदा चव्हाट्यावर आला असून, पोलीस स्टेशन व सहकार खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. ...

Movements for appointment of administrator on Telhara buying and selling organization | तेल्हारा खरेदी-विक्री संस्थेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

तेल्हारा खरेदी-विक्री संस्थेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

खरेदी विक्री संस्थेमधील संचालकांचा अंतर्गत वाद हा अनेकदा चव्हाट्यावर आला असून, पोलीस स्टेशन व सहकार खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. तरीही काही तोडगा निघत नसल्याने या संस्थेचा कारभार ठप्प पडला. परिणामी शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांना माल विकूनही पैसे मिळाले नाहीत. सद्य:स्थितीत या संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचे कामकाज होत नाही. अध्यक्षांनी राजीनामा दिला; परंतु मंजूर झाला नाही तर व्यवस्थापक व कर्मचारी संस्थेमध्ये येण्यास तयार नाहीत. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. अखेर शासनाने या संस्थेवर प्रशासक मंडळ नियुक्तीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे लवकरच या संस्थेवर प्रशासक मंडळ नियुक्त होणार आहे. प्रशासक मंडळामध्ये आठ जणांचा समावेश आहे. मात्र, या प्रशासक मंडळातील काही नावे बघून शेतकरी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. प्रशासक नियुक्तीसाठी कोणते निकष लावण्यात आले हे शेतकऱ्यांना कळेनासे झाले आहे. संस्थेकडे मोठ्या प्रमाणात पैसा शिल्लक आहे. तो शेतकऱ्यांच्याच कामी यावा, अशी शेतकरी वर्गातून माहिती आहे. शेतकऱ्यांनी २५ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची भेट घेतली आणि समस्या मांडली.

Web Title: Movements for appointment of administrator on Telhara buying and selling organization