शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

बंडोबांना थंडोबा करण्यासाठी हालचाली

By admin | Updated: October 1, 2014 00:48 IST

बुलडाणा जिल्ह्यात दिवसभर गुप्त बैठकांचे सत्र : मनधरणी अन् दबावासोबत प्रलोभनाचेही राजकारण.

बुलडाणा : विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर उतरल्यामुळे एक-एक मत महत्त्वाचे झाले आहे. मतविभाजन टाळून सामाजिक गणिते आपल्या बाजूने वळविण्यासाठी प्रत्येक उमेदवार प्रयत्न करीत आहे. आपल्या विरोधात रिंगणात उभ्या असलेल्या व मताधिक्य कमी करण्याची कुवत असलेल्या उमेदवाराची मनधरणी करण्यासाठी आज सर्वच तंत्र वापरण्यात आले. काहीही करा; पण बंडोबा थंडोबा करा, असे संदेश उमेदवारांनी त्यांच्या खास शिलेदारांना दिले आहेत.बुलडाणा मतदारसंघात सेना व भाजपासोबतच काँग्रेसमध्येही बंडाचे निशाण फडकले आहे. शिवसेनेतून पदावरून काढलेले मुन्ना बेंडवाल, भाजपाचे अँड. व्ही. डी. पाटील, काँग्रेसचे एकनाथ खर्चे अशा तिघांनी अर्ज दाखल केले असून, यांनी माघार घ्यावी म्हणून प्रयत्न होत असताना त्यांनी रिंगणात कायम राहावे, असाही प्रयत्न दुसर्‍या बाजूने अनेक हितचिंतकांनी केल्याची माहिती आहे. दरम्यान, एकनाथ खर्चे यांनी आज काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याने ते रिंगणात राहणार की नाही, याची उत्सुकता कायम आहे. मेहकर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या मंदाकिनी कंकाळ यांनी उमेदवारी दाखल करून राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार अश्‍विनी आखाडे यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. या मतदारसंघात प्रत्येक वेळी हिंदुत्ववादी मते व धर्मनिरपेक्ष मते यांचे मतविभाजन टाळण्यासाठी अपक्षांची मनधरणी केली जाते, यावेळीसुद्धा हा प्रयत्न आहे; मात्र त्यासाठी विशेष मोहीम सुरू असल्याचे कुठे दिसून येत नाही. गुप्त बैठकांवरच जोर आहे. सिंदखेडराजा मतदारसंघात आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे हे रिंगणात नसल्यामुळे त्यांचे सर्मथक सैरभैर आहेत. डॉ.शिंगणे यांच्यावर निष्ठा असलेले कार्यकर्ते त्यांच्या व्यतिरिक्त दुसर्‍या उमेदवारासाठी मतांचे परिवर्तन करतील का? हा प्रश्न असल्याने राष्ट्रवादीतून कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचे प्रकार युद्धस्तरावर सुरू होते.जळगाव जामोद मतदारसंघात जातीय समीकरणे डोळय़ासमोर ठेवून आज दिवसभरात जोरदार घडामोडी झाल्या. माळी, कुणबी, पाटील, दलित, बारी, धनगर अशा महत्त्वाच्या व संख्येने मोठय़ा असलेल्या समाजाचे उमेदवार उभे राहिले आहेत. त्यामुळे एका विशिष्ट समाजातील उमेदवाराने अर्ज मागे घेतला तर त्या समाजाची मते आपल्याला मिळतील, अशी गणिते प्रत्येक उमेदवार मांडत असल्याने आज दिवसभर त्या दृष्टीने घडामोडी होत होत्या. गुप्त बैठकांमधून उमेदवारी मागे घेण्याची मनधरणी सातत्याने सुरू होती. खामगाव मतदारसंघातही काँग्रेस व भाजपा या प्रमुख पक्षांकडून मतविभाजन टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आपल्याला न मिळणारी मते खाणारा दुसरा उमेदवार रिंगणात कसा राहील, यादृष्टीनेच मोर्चेबांधणी करण्यात आली आहे.चिखली मतदारसंघात मराठा समाजाच्या मतांमध्ये विभाजन होऊ नये, असा प्रयत्न सातत्याने केला जात असल्याचे दिसून आले, त्यामुळे उद्या, १ ऑक्टोबर रोजी या प्रयत्नांना किती यश आले, हे स्पष्ट होईल. मलकापूर मतदार संघामध्ये काँग्रेसच्या उमाताई तायडे यांनी बंडाचा झेंडा फडकविला असून, आज मेळावा घेत शक्तीप्रदर्शनही केले, त्यामुळे त्यांची उमेदवारी काँग्रेसला घातक ठरू नये, यासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत.