शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदान करून साजरा केला ‘मदर्स डे’

By admin | Updated: May 14, 2017 04:13 IST

शिर्ला येथे जलसंधारणाच्या कामांना आला वेग!

शिर्ला : पावसाचे पाणी जमिनीत मुरावे, यासाठी अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्यावतीने वॉटर कप स्पर्धा राबवण्यात येत आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या शिर्ला येथे श्रमदानाचे तुफान आले आहे. १४ मे रोजी मदर्स डे साजरा होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला गावातील सात माय-लेकींनी सलग दोन तास श्रमदान करून ह्यमदर्स डेह्ण साजरा केला. गावाच्या दुष्काळ मुक्तीसाठी शिर्ला येथे ग्रामस्थांसह अधिकारी, पदाधिकारी श्रमदान करीत आहेत. या गावाला नुकतीच अभिनेता आमिर खान यांनी त्यांची पत्नी किरण राव यांच्यासह भेट दिली होती. त्यामुळे ग्रामस्थांचा उत्साह आणखी वाढला असून, श्रमदानाला वेग आला आहे. वॉटर कप मिळवण्याच्या दृष्टीने ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. नुकत्याच झालेल्या बुद्ध पौर्णिमेला एक हजार उपासकांनी श्रमदान केले होते. शिर्ला येथे श्रमदानातून आगळे-वेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यातीलच एक भाग म्हणजे सात मायलेकींनी श्रमदानासाठी पुढाकार घेऊन सलग दोन तास श्रमदान केले. यावेळी कंटूर बांधाची निर्मिती करून खर्या अर्थाने ह्यमदर्स डेह्ण साजरा केला. या श्रमदानात गावच्या सरपंच रीना शिरसाट, स्पर्श संघटनेच्या सीमा ताकसांडे, रेखा गवई, मेघा इंगळे, प्रीती उगले, शामल गवई, मृणाल इंगळे, लीला इंगळे, स्वाती इंगळे, सानिका उगले आदींनी सहभाग घेतला. शिर्ल्यात जलसंधारणाच्या कामाला वेगसत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेंतर्गत शिर्ला येथील जलसंधारणाच्या विविध कामांना गती आली आहे. समतल चर,अनघड बांध, माती तलाव, ढाळीचे बांध, पाझर तलावांचा गाळ काढणे, अस्तिवातील पाणी वाहून जाणार्या बांधाची पाणी धारण क्षमता वाढवणे, सुवर्णा नदीत पाणी साठवण क्षमता डोह तयार करणे, कंटुर बांध, कंपार्टमेंट बंडींग, सिमेंट प्लग, बांध बंदीस्ती, जुन्या बंधार्यातील गाळ काढणे, खोलीकरण करून बंधार्याची पाणी धारण क्षमता वाढवणे, विहीर पुनर्भरण करणे आदींसह विविध जलसंधारणाची कामे अंतिम टप्प्यात आहेत.