शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
3
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
4
नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला
5
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
6
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
7
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
9
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
10
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
11
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
12
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
13
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
14
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
15
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
16
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
17
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
18
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
19
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
20
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
Daily Top 2Weekly Top 5

दर्शनासाठी आलेल्या अमरावती जिल्ह्यातील मायलेकी पूर्णा नदीच्या पुरात वाहून गेल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 15:58 IST

मिळून आलेला मृतदेह हा विमल मनोहर अंभोरे (६०) या महिलेचा असून सारीका प्रदीप मोहोड (३४) या महिलेचा शोध सुरु आहे.

मूर्तिजापूर :  तालुक्यातील ग्राम दुर्गवाडा येथे देवदर्शनाला आलेल्या अमरावती जिल्ह्यातील मायलेकी  मंगळवार, २२ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजताच्या दरम्यान पुर्णा नदीच्या पुरात वाहून गेल्या. त्यातील एका ६० वर्षीय महिलेचा मृतदेह सकाळी  गावकºयांना सापडला. तर मुलीचा शोध घेणे सुरु आहे. अमरावती जिल्ह्यातील एक कुटुंब दुर्गवाडा येथील मुखोर्जी महाराज मंदिरात २१ सप्टेंबर रोजी आले. दिवसभर पाऊस सुरू असल्याने गावी परत जाणे शक्य झाले नाही. विमल मनोहर अंभोरे रा. रेवसा (वलगाव), सारीका प्रदीप मोहोड, प्रदीप मोहोड, बेबीताई मोहोड सर्व राहणार रा. जामठी ता. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती यांनी रात्री मंदिरातच मुक्काम केला. यातील विमल मनोहर अंभोरे (६०) रा. रेवसा व सारीका प्रदीप मोहोड (३४) रा जामठी ता. नांदगाव खंडेश्वर या दोघी मायलेकी पहाटे ६ वाजताचे दरम्यान नदीकाठावर प्रातवीधीसाठी गेल्या असता पुर्णा नदीला अकस्मात आलेल्या पुरात दोघीही वाहून गेल्या. सततच्या पावसाने पुर्णा नदी दुथडी वाहत असताना लाखपूरी येथील काही लोक पुर पहाण्यासाठी व पट्टीचे पोहणारे जलतरण करीत असताना एका ६० वर्षीय महिलेचा मृतदेह वाहत येताना दिसला असता पोहणा?्या नागरीकांनी मृतदेह नदीकाठावर आणला. घटनेची माहिती पोलीस पाटील डिगांबर नाचणे यांनी ग्रामीण पोलीसांना देताच हेड कॉन्स्टेबल सुभाष उघडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील नवलाखे, हेड कॉन्स्टेबल शिवानंद मोहोड, आय बाईक पथकाचे नायक पोलीस शिपाई संतोष गवई, प्रवीण वाकोडे यांनी सहका?्यासह घटनास्थळ गाठले अधिक चौकशी दरम्यान दुर्गवाडा येथून वाहून गेल्याचे निष्पन्न झाले. मिळून आलेला मृतदेह हा विमल मनोहर अंभोरे (६०) या महिलेचा असून सारीका प्रदीप मोहोड (३४) या महिलेचा शोध सुरु आहे. (शहर प्रतिनिधी )

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर