शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

आता मुलाखतीपूर्वीच भावी अधिका-यांची वैद्यकीय तपासणी

By admin | Updated: January 9, 2015 01:52 IST

एमपीएससी ; सामान्य प्रशासनाचा निर्णय.

संतोष वानखडे/वाशिम:  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांची तयारी करणार्‍या उमेदवारांना आता मुलाखतीपूर्वीच वैद्यकीय तपासणीला सामोरे जावे लागणार आहे. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीला जातानाच उमेदवारांना शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांचे प्रमाणपत्र सोबत न्यावे लागणार आहे. यापूर्वी अंतिम निवड झाल्यानंतरच उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जायची. राज्यस्तरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वर्ग एक, दोन व तीनच्या अधिकार्‍यांची निवड केली जाते. त्यासाठी पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यातून उमेदवारांची निवड केली जाते. अंतिम निवड झाल्यानंतर उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे की नाही, याची खात्री म्हणून उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाते. २0१४ पर्यंत अंतिम निवड झाल्यानंतरच उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जात होती. आता २0१५ या नववर्षापासून निवड प्रक्रीयेमध्ये महत्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानुसार मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणीचे प्रमाणपत्र मुलाखतीपूर्वीच सादर करणे सामान्य प्रशासन विभागाने सक्तीचे केले आहे. हे प्रमाणपत्र नसल्यास उमेदवाराला मुलाखत देता येणार नाही. त्यामुळे मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना सक्षम वैद्यकीय प्राधिकार्‍याचे प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. पूर्वीच्या पद्धतीमध्ये अंतिम निवड झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी उमेदवाराची वैद्यकीय चाचणी केली जात होती. वैद्यकीय तपासणीत काही व्यंग आढळून आल्यास ते पद रिक्तच राहत होते. या पृष्ठभूमीवर हा बदल करण्यात आला आहे. त्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर वैद्यकीय प्रमाणपत्राचा नमुदा देण्यात आला आहे. त्या नमुन्यावर उमेदवाराने स्वत:चे छायाचित्र लावून सक्षम वैद्यकीय अधिकार्‍याची सही आणि शिक्का घेऊन ते मुलाखतीच्यावेळी सोबत आणणे बंधनकारक राहणार आहे.