शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती वादातून विवाहितेची आत्महत्या

By admin | Updated: August 18, 2014 01:44 IST

अकोला येथील प्रकार, पतीने हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप

अकोला : घरगुती वादातून विवाहितेने छताच्या पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री २.३0 वाजताच्या सुमारास घडली; परंतु विवाहितेच्या आई-वडिलांनी आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून, तिची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. विवाहितेच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्याचे पोलिसांनी म्हटले आहे. गोरक्षण रोडवरील कपिलवस्तूनगरात राहणारी अर्चना प्रफुल्ल पोहरे (३२) हिने घरगुती वादातून शनिवारी रात्री आत्महत्या केली. पतीला रात्री जाग आल्यानंतर त्याला पत्नीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानेच तिला खाली उतरविले आणि खदान पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अर्चनाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी रविवारी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. रविवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास अर्चनाचे वडील हरी सटवाजी कापसे, आई सरस्वतीबाई हे नातेवाईकांसह भोपाळ येथून खदान पोलिस ठाण्यात आले. त्यांनी पोलिसांना दोन वर्षांपूर्वी अर्चना हिचा विवाह झाला. तिचा पती प्रफुल्ल मोबाईल दुरुस्तीचे काम करतो. त्याला दारूचे व्यसन होते. यातूनच तो तिचा शारीरिक व मानसिक छळ करायचा. घटनेच्या चार ते पाच दिवसांपूर्वी पती प्रफुल्ल पोहरे याने अर्चनाला बेदम मारहाण केली होती. त्यामुळे सरस्वती कापशे या तिला घ्यायला आल्या होत्या; परंतु प्रफुल्लने सासूबाईचे हातपाय जोडून माफी मागितली आणि पुन्हा असे करणार नाही. असे म्हटल्याने अर्चना माहेरी गेली नाही. अर्चनाने आत्महत्या केली नसून, तिची हत्याच झाल्याचा आरोप अर्चनाचे मामा धर्मा भोनाजी खंडारे यांनी केला आहे.