मल्हार प्रतिष्ठानने केले ‘ढोल बजाओ' आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 04:42 PM2020-09-25T16:42:56+5:302020-09-25T16:43:59+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ढोल बजाओ' आंदोलन करुन मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

Malhar Pratishthan launches 'Dhol Bajao' movement! | मल्हार प्रतिष्ठानने केले ‘ढोल बजाओ' आंदोलन!

मल्हार प्रतिष्ठानने केले ‘ढोल बजाओ' आंदोलन!

Next

अकोला : धनगर जातीचा अनुसूचित जमातीमध्ये (एसटी)समावेश करण्याच्या मागणीसाठी मल्हार प्रतिष्ठान या समाजिक संघटनेच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ढोल बजाओ' आंदोलन करुन मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
धनगर जातीचा अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) समावेश करुन ‘एसटी’चा दाखला देण्यात यावा, अशी मागणी करीत मल्हार प्रतिष्ठान अकोला जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना सादर करण्यात आले. या आंदोलनात मल्हार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन नागे, जिल्हाध्यक्ष प्रवीण गव्हाळे, भुषण सोनाग्रे, सागर मोरे, संदीप काळदाते, ज्ञानेश्वर गावंडे, चेतन भिसे, अजय घोंगे, गौरव सोनाग्रे, शंकर पारेकर, राहुल नवलकार, सतिष साबळे, प्रमोद नागे यांच्यासह इतर पदाधिकारी- कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Malhar Pratishthan launches 'Dhol Bajao' movement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.