शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

वणवा लागून नैसर्गिक संपदा नष्ट होण्यात महाराष्ट्र दुसरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 1:20 PM

अकोला: वणवा लागून नैसर्गिक संपदा नष्ट होण्याच्या घटनेत महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरले आहे. भारतीय वन सर्वेक्षण संस्थेच्या (ऋ रक) जानेवारीमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे.

- राजेश शेगोकारअकोला: वणवा लागून नैसर्गिक संपदा नष्ट होण्याच्या घटनेत महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरले आहे. भारतीय वन सर्वेक्षण संस्थेच्या (ऋ रक) जानेवारीमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे. डिसेंबर २०१८ या अवघ्या एका महिन्यात कर्नाटकनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक वणवे लागले असल्याचे या अहवालात म्हटले आहे. कर्नाटकात एकूण ७७, महाराष्ट्रात ३४, अरुणाचल प्रदेश २७ तर नागालँड आणि आंध्र प्रदेशमध्ये अनुक्रमे २४ वनव्यांच्या घटना घडल्या आहेत.भारतीय वन सर्वेक्षण संस्था ही उपग्रहावरून जंगलातीलआगीच्या घटनांची नोंद घेते. त्यानुसार जीपीएसच्या आधारे प्रत्यक्ष वन क्षेत्रात जाऊन कर्मचारी तपासणी करतात. अशा आगींची माहिती सर्व राज्यांना माहिती दिली जाते त्याला ‘फॉरेस्ट अर्लट’ असे म्हणतात. २०१८ च्या डिसेंबर मध्ये कर्नाटकाच्या वनक्षेत्रात सर्वाधिक फॉरेस्ट अलर्ट प्राप्त झाले आहेत, तर महाराष्ट्र हे दुसऱ्या स्थानावर आहे. हे निष्कर्ष आश्चर्यचकित करणारे आहेत. वन विभागाचा फायर सीझन डिसेंबरमध्ये सुरू होते आणि पहिल्याच महिन्यातील आकडेवारी चिंताजनक आहे. महाराष्ट्रातील मेळघाट, पेंच, ताडोबा, नवेगाव या व्याघ्र प्रकल्पात तर टिपेश्वर, पैनगंगा, उमरेडसारख्या अभयारण्यात आगी लागल्याच्या घटना घडल्या असून महाराष्ट्रातील सर्व वणवे मानव निर्मित आहेत. त्यामुळे वनसंपदेबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज निर्माण झाली आहे. 

 वणव्यामुळे वाघ ते वाळवी अशी संपूर्ण अन्न साखळी धोक्यात येते. यात केवळ वन्य प्राणी व पक्षी यांनाच जीव गमवावा लागत नाहीत, तर साप, पाल, सरडे, मुंग्या या प्रकारच्या जीवांच्या मृत्यूचे प्रमाण मोजता येत आहे. वणवा हा वनांना एक मोठा धोका आहे. गवत जळल्यामुळे तृणभक्षी प्राण्यांची उपासमार होते. वाघाचे खाद्य धोक्यात येते. यासंदर्भात स्थानिक समुदायांना सुशिक्षित करावे लागेल, तसेच वणवा लागणार नाही, यासाठी अधिक प्रभावी उपयोजना करणे आवश्यक आहे.- यादव तरटे पाटील,वन्यजीव अभ्यासक, अमरावती.

 

टॅग्स :Akolaअकोलाforestजंगलfireआग