शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
4
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
5
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
6
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
7
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
8
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
9
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
10
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
11
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
12
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
13
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
14
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
15
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
16
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
17
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
18
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
19
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 :पश्चिम वऱ्हाडात १६९ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 22:15 IST

अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये ६५ उमेदवारांनी माघार घेतली.

ठळक मुद्देअकोल्यातील पाच विधानसभा मतदारसंघात ३३ उमेदवारांनी माघार घेतली.बुलडाण्याच्या सात मतदारसंघातून १६ उमेदवारांनी माघार घेतली.वाशिममधील तीन मतदारसंघात १६ उमेदवारांनी माघार घेतली.

- राजेश शेगोकार

 अकोला: पश्चिम वऱ्हाडाच्या अकोला, बुलडाणावाशिम या तीन जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये ६५ उमेदवारांनी माघार घेतली असून, आता १६९ उमेदवार रिंगणात कायम राहिले आहेत. बुलडाण्यात भाजप, अकोट व वाशिममध्ये शिवसेना तर रिसोड मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. बुलडाण्यातील जळगाव जामोद मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे ४ उमेदवार असून, अकोल्याच्या अकोट मतदारसंघात सर्वाधिक १७ उमेदवार आहेत.अकोल्यातील पाच विधानसभा मतदारसंघात ३३ उमेदवारांनी माघार घेतली असून, ६८ उमेदवार रिंगणात कायम आहेत. अकोट मतदारसंघात शिवसेनेचे अनिल गावंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने येथे युतीमध्ये बंडखोरी झाली आहे. गावंडे यांनी महिनाभरापूर्वीच शिवसेनेत प्रवेश घेतला होता. ही एकमेव बंडखोरी वगळता उर्वरित चारही मतदारसंघात दिग्गजांनी माघार घेतली आहे. त्यामध्ये विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, माजी मंत्री डॉ.डी.एम. भांडे, डॉ. संतोष हुशे आदींचा समावेश आहे. अकोला पश्चिममध्ये सर्वात कमी ९ तर अकोटमध्ये सर्वाधिक १७ उमेदवार रिंगणात असून, अकोला पूर्व १३, बाळापूर १५ व मूर्तिजापूर मतदारसंघात १४ उमेदवार कायम आहेत.वाशिममधील तीन मतदारसंघात १६ उमेदवारांनी माघार घेतली असून, ४२ उमेदवार रिंगणात आहेत. येथे वाशिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर शशिकांत पेंढारकर हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात कायम असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी रिसोड विधानसभा मतदारसंघात बंडखोरी केली आहे.बुलडाण्याच्या सात मतदारसंघातून १६ उमेदवारांनी माघार घेतली असून, ५९ उमेदवार रिंगणात आहेत. बुलडाणा विधानसभा मतदारसंघात एकही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने सात उमेदवार कायम असून, येथे भाजपाचे नेते योगेंद्र गोडे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. शिवसेनेचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. बुलडाण्यातील जळगाव जामोद मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे ४ उमेदवार असून, सर्वाधिक ११ उमेदवार मलकापूर मतदारसंघात आहेत.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019washimवाशिमAkolaअकोलाbuldhanaबुलडाणा