शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरी खून खटल्यातील आरोपीस जन्मठेप

By admin | Updated: July 11, 2015 01:38 IST

रिसोड तालुक्यातील मांगवाडी हत्याकांडप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल.

वाशिम : पत्नीसोबत घरगुती कारणावरुन झालेला वाद विकोपाला जावून घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील एका आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हे हत्याकांड रिसोड तालुक्यातील मांगवाडी शेत शिवारात घडले होते. मांगवाडी (रिसोड) येथे ११ ऑक्टोबर २0१0 दोजी दुपारी हे हत्याकांड घडले होते. आरोपी अर्जुन भानुदास देव्हारे हा घटनेच्या दिवशी पत्नी प्रयागबाई आणि वडील भानुदास यांच्यासोबत शेतात काम करीत होता. त्यावेळी पत्नीसोबत आरोपीचा घरगुती कारणावरुन वाद झाला. त्याचा राग येवून आरोपीने कुर्‍हाडीने पत्नीच्या डोक्यावर वार करुन गंभीर जखमी केले होते. त्यावेळी बाजुच्या शेतात असलेले आरोपीचे काका रामेश्‍वर वाळके, विश्‍वनाथ वाळके आणि आजोबा नामदेव देव्हारे हे समजावण्यासाठी गेले असता, आरोपीने त्यांनाही मारहाण केली. या हल्ल्यात देव्हारे यांचा जागीच, तर विश्‍वनाथ वाळके यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. रागाने बेभान झालेल्या आरोपीने वाटेल त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. लोणी- रिसोड मार्गावरील मांगवाडी फाट्याजवळ लोकांवर दगडफेक करून, दुचाकीने जाणार्‍या सुखदेव आणि पार्वती कांबळे या दाम्पत्यास अडवून त्यांनाही लाकडी राफ्टरने मारहाण केली. याशिवाय रमेश थोरात, सुखदेव कांबळे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही मारहाण केली. पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर, त्यांनी गावकर्‍यांच्या मदतीने आरोपीस ताब्यात घेतले. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक किरण साळवे यांनी घटनेचा तपास करुन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. न्यायालयाने या प्रकरणी १३ साक्षीदार तपासले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद, प्रत्यक्ष साक्षीदार, तसेच अन्य पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध झाल्यामुळे आरोपी अर्जुन देव्हारे यास कलम ३0२ नुसार जन्मठेप आणि पाचशे रुपये दंड, कलम ३२५ नुसार ३ वर्ष सक्त मजुरी तसेच कलम ३४१ नुसार एक महिना साधी कैद आणि शंभर रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अँड. अरुण सरनाईक यांनी युक्तिवाद केला.