शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्याकडे शेतकर्‍यांची पाठ

By admin | Updated: August 19, 2014 00:16 IST

गतवर्षी १.६0 लाख विमाधारक शेतकरी : यावर्षी केवळ ६९ हजार शेतकर्‍यांचा विमा

वाशिम: २0१३-१४ च्या खरीप पीक विमा योजनेंतर्गत अपेक्षीत नुकसानभरपाई पदरी न पडल्याच्या धक्क्यातून जिल्ह्यातील शेतकरी अजूनही सावरला नसल्याची बाब समोर येत आहे. गतवर्षी १ लाख ५९ हजार ६८९ शेतकर्‍यांनी विमा उतरविला होता. यावर्षी मात्र केवळ ६९ हजार शेतकर्‍यांनी खरीप पिकांचा विमा काढला आहे. कृषीप्रधान देशातील शेतकरी चोहोबाजूंनी येणार्‍या नैसर्गिक व मानवी संकटांनी खचून जात आहे. नैसर्गिक व मानवी संकटांच्या मालिकेतून स्वत:ला सावरत असलेल्या शेतकर्‍यांचा उद्योजक व व्यापार्‍यांकडूनदेखील 'हिरमोड' होत असतो. नैसर्गिक आपत्तीत सापडणार्‍या पिकांना विम्याचे संरक्षण देण्यासाठी शासनाने पीक विमा योजना आणली आहे. गतवर्षी २0१३-१४ च्या खरीप हंगामात वाशिम जिल्ह्यातील १ लाख ५९ हजार ६८९ शेतकर्‍यांनी या योजनेत सहभाग नोंदविला होता. यापैकी केवळ ५१ हजार ४९0 शेतकर्‍यांना नुकसानभरपाईच्या यादीत स्थान मिळाले होते. अतवृष्टी आणि गारपीटीने रिसोड तालुक्यातील शेतकर्‍यांना अक्षरश: झोडपले होते. मात्र, मूग पिकाचा अपवाद वगळता उर्वरीत कोणत्याच पिकाचा विमा शेतकर्‍यांना मिळाला नाही. गतवर्षीचा अनुभव आणि यावर्षीचे कोरड्या दुष्काळाचे संकट बघून सुरूवातीपासून जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी पीक विमा योजनेकडे पाठ फिरविली होती. कृषी विभागाने जनजागृती करून पीक विम्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. ३१ जुलैची अंतिम मुदत १६ ऑगस्टपर्यंत वाढविली. मात्र, शेतकर्‍यांच्या शंकांचे निरसन करण्यात विमा कंपनी व कृषी विभागाला अपेक्षीत यश न आल्याने विमा काढणार्‍या शेतकर्‍यांची संख्या यावर्षी जवळपास ९0 हजाराने घटली. विमा कंपनीच्या जाचक अटी, गतवर्षीच्या अतवृष्टीनंतरही विमा योजनेचा लाभ न मिळणे आणि यावर्षीची दुष्काळसदृश्य स्थिती या वास्तवतेच्या ओझ्याखाली पीक विमा योजनेची जनजागृती मोहिम अक्षरश: दबून गेली. १६ ऑगस्टच्या अंतिम मुदतीनंतर हाती आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील केवळ ६९ हजार शेतकर्‍यांनी खरीप पीक विमा काढला आहे.