शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:18 IST

पालकमंत्र्यांचा पुढाकार; आयएमए व मेडिकल कॉलेजचे सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: गृहराज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना़ डॉ़ रणजित पाटील यांच्या पुढाकाराने पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे २२ जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे़ महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाद्वारा आयोजित या शिबिराचा पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे़धकाधकीच्या व स्पर्धेच्या या काळात पत्रकारिताही प्रचंड धावपळीची झाली आहे़ या धावपळीत बरेचदा पत्रकारांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते़ योग्य वेळेवर योग्य त्या तपासण्या केल्या नाहीत, तर त्याचे परिणाम अनेकांना आयुष्यभर भोगावे लागतात़ हीच बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाने पत्रकारांच्या आरोग्य तपासणीची संकल्पना मांडली़ ही संकल्पना पालकमंत्री ना़ डॉ़ रणजित पाटील यांना पटल्याने त्यांनी ताबडतोब यासाठी तपासणी शिबिर घेण्याचे निर्देश दिले़ त्यांच्या निर्देशानुसार शनिवार २२ जुलै रोजी सकाळी ९ ते १२ या कालावधीत हे शिबिर पार पडणार आहे़ सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या आएमए सभागृहात महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या सदस्यांनी सकाळी ९ वाजता उपाशीपोटी या शिबिरासाठी उपस्थित राहावयाचे आहे़ लिपीड प्रोफाइल, ईसीजी, नेत्र तपासणीसारख्या महत्त्वपूर्ण तपासण्या या शिबिरात करण्यात येणार असून, पालकमंत्री डॉ़ रणजित पाटील स्वत: यावेळी हजर राहणार आहेत़ सकाळी त्यांच्याच हस्ते शिबिराचे उद्घाटन होईल़ आयएमएचे अध्यक्ष डॉ़ पुरुषोत्तम तायडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या समारंभाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहायक अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, डॉ़ नरेश बजाज, महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम आवारे पाटील, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. सुधाकर खुमकर, जिल्हाध्यक्ष अनिल माहोरे, विभागीय अध्यक्ष विठ्ठल महल्ले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत़ शिबिर तथा उद्घाटन कार्यक्रम अगदी वेळेवर सुरू होणार असल्याने सर्वांनी कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल माहोरे, कार्याध्यक्ष नीरज आवंडेकर आणि जिल्हा सरचिटणीस जावेद जकेरिया यांनी केले आहे़