शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बालवाड्यांच्या मुद्यावरून महापालिका द्विधा मन:स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 12:44 IST

अकोला: महापालिका शाळेतील बालवाड्या बंद करून त्याऐवजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्या अखत्यारित असलेल्या अंगणवाड्यांचे मनपा शाळांमध्ये स्थानांतरण करण्याचा बाल विकास विभागाच्या आयुक्तांचा प्रस्ताव कधीचाच हवेत विरला.

अकोला: महापालिका शाळेतील बालवाड्या बंद करून त्याऐवजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्या अखत्यारित असलेल्या अंगणवाड्यांचे मनपा शाळांमध्ये स्थानांतरण करण्याचा बाल विकास विभागाच्या आयुक्तांचा प्रस्ताव कधीचाच हवेत विरला. बाल विकास विभाग व मनपाच्या संयुक्तिक सर्व्हेनंतर मनपाच्या ३३ पैकी फक्त पाच शाळांमध्ये अंगणवाडी सुरू करता येणार होती. यामुळे मनपा प्रशासनाने बंद केलेले बालवाडीचे वर्ग यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून पुन्हा सुरू करण्याची गरज असताना या मुद्यावरून मनपा उपायुक्त विजयकुमार म्हसाळ द्विधा मन:स्थितीत सापडल्याची माहिती आहे.महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ होत नसल्याने मनपा शाळांवर समायोजनाची परिस्थिती ओढवली. गोरगरीब कुटुंबांना महागड्या कॉन्व्हेंटचा खर्च परवडणारा नसल्यामुळे मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी २०१७ मध्ये मनपाच्या ३३ शाळांमध्ये बालवाडीचे वर्ग सुरू केले. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी मानधन तत्त्वावर ३३ स्वयंसेविका व ३३ मदतनीस यांची पदभरतीद्वारे नियुक्ती केली. सेविकांना तीन हजार रुपये, तर मदतनीस यांना एक हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता. बालवाडीचे वर्ग सुरू होऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत नाही तोच एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या आयुक्तांनी मनपाने सुरू केलेली बालवाडी व शहरातील अंगणवाडीच्या संदर्भात भूमिका स्पष्ट केली. मनपाने शहरातील १७९ अंगणवाड्यांसाठी वर्गखोल्या उपलब्ध करून दिल्यास अंगणवाडीतील विद्यार्थी पुढील पहिल्या वर्गासाठी मनपा शाळेत प्रवेश घेऊ शकतील. यामुळे मनपा शाळांची पटसंख्या कायम राहण्यासोबतच शासनाचा उद्देश सफल होणार असल्याचे सुचवित एकात्मिक बाल विकास विभागाच्या आयुक्तांनी बालवाडीचे वर्ग बंद करून अंगणवाड्यांचे मनपा शाळांमध्ये स्थानांतरण करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले होते.पुढे काहीच झाले नाही!शहरातील एकूण १७९ अंगणवाड्या मनपाच्या शाळेत स्थानांतरण करण्यापूर्वी बाल विकास विभाग व मनपाने शाळांची संयुक्तिक पाहणी केली असता मनपाच्या ३३ शाळांपैकी केवळ पाच शाळांमध्ये अंगणवाडीचे वर्ग सुरू करता येणार होते. २०१८ मध्ये ही प्रक्रिया ठप्प पडल्यानंतर पुढे काहीच झाले नाही.

बालवाडी बंद; विद्यार्थी वाऱ्यावरमनपा शाळेत अंगणवाडी सुरू करण्याच्या लगबगीत मोठ्या उत्साहाने सुरू केलेले बालवाडीचे वर्ग बंद करण्याची वेळ प्रशासनावर ओढवली.मनपा शाळेत बालवाडीचे वर्ग सुुरू झाल्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे खुली झाली होती. बालवाडी बंद झाल्याने गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी वाºयावर आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका