निमवाडी परिसरात इसमाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:19 AM2020-12-06T04:19:57+5:302020-12-06T04:19:57+5:30

चांदूर येथील रहिवासी बाबूराव नामक इसमाचा मनाेज इंगळे नामक युवकाशी वाद झाला. काैटुंबिक कारणावरून या दाेघांचे नेहमीच खटके उडत ...

Isma's brutal murder in Nimwadi area | निमवाडी परिसरात इसमाची निर्घृण हत्या

निमवाडी परिसरात इसमाची निर्घृण हत्या

googlenewsNext

चांदूर येथील रहिवासी बाबूराव नामक इसमाचा मनाेज इंगळे नामक युवकाशी वाद झाला. काैटुंबिक कारणावरून या दाेघांचे नेहमीच खटके उडत असल्याने शनिवारी रात्री मनाेज इंगळे याने धारदार शस्त्रांनी बाबूराव नामक इसमाची निर्घृण हत्या केली. या हत्येचे नेमके कारण समाेर आले नाही; मात्र पाेलिसांनी चाैकशी सुरू केली आहे. या हत्याकांडाची माहिती मिळताच शहर पाेलीस उप-अधीक्षक सचिन कदम, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेष सपकाळ, खदानचे ठाणेदार डी. सी. खंडेराव यांनी पथकासह धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळ पंचनामा करून या प्रकरणातील आराेपीचा शाेध सुरू केला असून, एकास संशयावरून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. यावेळी फाॅरेन्सिक टीमनेही घटनास्थळावरून परिस्थितीजन्य पुरावे गाेळा केले आहेत. याप्रकरणी खदान पाेलीस ठाण्यात रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली हाेती. या हत्येचे नेमके कारण समाेर आले नसले तरी जावयानेच सासऱ्याचा खून केल्याची चर्चा पाेलीस खात्यात सुरू आहे.

शहरात हत्याकांडाचे सत्र

शहरात गत काही महिन्यांपासून हत्याकाडाचे सत्र सुरू आहे. काैटुंबिक वादातून हत्या हाेत असल्याचे अकाेट फैल व निमवाडी येथे घडलेल्या घटनेवरून समाेर येत आहे. अकाेट फैल पाेलीस ठाण्याच्या हद्दीत गत काही दिवसांपूवी पतीने पत्नीची हत्या केली हाेती. त्यानंतर आता पुन्हा अशाच प्रकारे काैटुंबिक वादातून निमवाडी येथे हत्या झाल्याची माहिती आहे.

Web Title: Isma's brutal murder in Nimwadi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.