अकोला : विमा क्षेत्रात एफडीआयला अखिल भारतीय विमा कर्मचारी असोसिएशनने विरोध दर्शविला असून, या विरोधात आयुर्विमा कार्यालयासमोर शुक्रवारी असोसिएशनच्या पदाधिकारी, सदस्यांनी निदर्शने केली.विमा क्षेत्रात एफडीआय म्हणजे भारतीय आयुर्विमा कर्मचार्यावर अन्याय करणेच होय, अशा घोषणा असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी यावेळी दिल्या. असोसिएशनचे अध्यक्ष ए.जे.खेडकर, सचिव पी.व्ही. रावदेव यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या निदर्शनात बी.के.सिरसाट, एम.व्ही. कासार, एस.ए.तराळे, एम.आर.जगताप, एस.आर. कुळकर्णी, पी.व्ही. इंगोले, नागझरे, डी.पी. पवार, निपानकर यांच्यासह सबनीस, श्रीगांर, लोटे, हिंगणे असोसिएशनच्या आदी पदाधिकारी उपस्थिती होते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}