शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विश्‍वचषक कॅरम स्पर्धेत भारतीय संघ विजेता

By admin | Updated: September 20, 2014 00:43 IST

मालदिव येथे संपन्न झालेल्या विश्‍वचषक कॅरम स्पर्धेत भारतीय संघाचे विजेतेपद कायम.

अकोला: मालदिव येथील सन आयलॅण्ड रिसॉर्टमध्ये १७ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या विश्‍वचषक कॅरम स्पर्धेत भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करून विजेतेपद कायम राखले. स्पर्धेत १७ देश सहभागी झाले होते. कॅरम असोसिएशन ऑफ मालदिवचे अध्यक्ष अहमद मुबीन यांच्या देखरेखीखाली स्पर्धा यशस्वी झाली. मालदिवमधील भारतीय दूतावासचे उच्चायुक्त राजीव शहारे यांनी भारतीय संघाचे व्यवस्थापक प्रभजितसिंह बछेर (अकोला-विदर्भ) यांच्यामार्फत भारतीय संघाच्या विजयी कामगिरीबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या.भारताने पुरुष गटात प्रथम तर श्रीलंका व बांगला देशाने द्वितीय व तृतीयस्थान पटकाविले. महिला विभागात भारत प्रथम, श्रीलंका द्वितीय व मालदीव तृतीय स्थानावर राहिला.पुरुष एकेरीत भारताच्या के. श्रीनिवास याने देशाच्या मो. गुफरान याचा १३-२५, २५-१८, २५-१८ असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. तिसर्‍या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत भारताच्या व्ही.आकाश याने भारताच्याच रियाज अकबर अली याचा २५-११, २५-१२ असा पराभव केला. माजी विश्‍वकप विजेती दोन वेळा विश्‍वविजेत राहिलेल्या भारताच्या रश्मीकुमारी हिने कविता सोमांची हिचा २५-१७, २५-२२ असा पराभव करून विश्‍वविजेतेपद यावेळीही जिंकले. भारताच्याच काजलकुमारी व पी. जयश्री यांनी तिसरे व चौथेस्थान प्राप्त केले. पुरुष व महिला दुहेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण व रौप्यपदक जिंकली. स्विस लीग एकेरीत रौप्य व कांस्य पदक पटकाविले. प्रशिक्षक डॉ. नीरज संपथी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झालेल्या भारतीय कॅरम संघाची भविष्यातही चांगली कामगिरी होण्यासाठी ऑल इंडिया कॅरम फेडरेशन प्रयत्नशील राहणार असल्याचे ऑल इंडिया कॅरम फेडरेशन महासचिव प्रभजितसिंह बछेर यांनी दुरध्वनीवरून कळविले.