शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

अवैध सावकाराच्या घरावर छापा!

By admin | Updated: May 14, 2017 04:28 IST

शेतकर्यांची तक्रार: स्वाक्षरी केलेले कोरे मुद्रांक, धनादेश, खरेदीखते जप्त

अकोला : अवैध सावकारी कायद्यानुसार तालुका उपनिबंधक सहकार विभागाच्या अधिकारी व अकोट फैल पोलिसांनी आपातापा रोडवरील संत कबीर नगरातील अवैध सावकाराच्या घरावर शनिवारी दुपारी छापा घातला. छाप्यामध्ये अवैध सावकाराकडील स्वाक्षरीसह कोरे मुद्रांक, कोरे धनादेशासह सावकारी व्यवहाराची नोंदवही, खरेदीखत जप्त केले. जप्त केलेल्या कागदपत्रांमधून कोट्यवधी रुपयांचा अवैध सावकारी व्यवसाय असल्याचे उघडकीस आले. अंबिकापूर येथे राहणारे संतोष नानासाहेब इंगळे व मनकर्णा नागोराव पाचपोहे यांनी तालुका उपनिबंधक सहकार विभाग सुरेखा फुपाटे यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार संतोष इंगळे यांच्या मालकीची गट नं. ९२ आपातापा शिवारामधील पाच एकर शेतीचा व्यवहार संतोष भोसलेसोबत २0१२ मध्ये झाला. या शेतीवर त्याचाच ताबा आहे. संतोष भोसले हा इतरांच्या नावाने व्यवहार करीत असल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तालुका उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी शनिवारी दुपारी संतोष भोसले यास नोटिस बजावून कारवाईस सुरुवात केली. अवैध सावकारीचा व्यवसाय करणारा संतोष गोविंद भोसले याच्या संत कबीर नगरातील घरावर छापा घालून खरेदीखत, कोरे धनादेश स्वाक्षरी केलेल्या, कच्च्या पावत्या, नोंदवही, इसार पावती, नोटरी, पत्र स्वाक्षरी केलेले कोरे मुद्रांक अशी कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची कागदपत्रे जप्त केली. शेतकर्यांकडील शेती गहाण ठेवून संतोष भोसले याने हे व्यवहार केले असल्याचे तपासात उघड झाले. ही कारवाई तालुका उपनिबंधक सहकार विभाग सुरेखा फुपाटे, सहकार अधिकारी डी. एस. सातरोटे, नरेंद्र धार्मिक, जे. एस. सहारे, तलाठी महेंद्र कदम, तलाठी उज्जवल मानकीकर, अकोट फैलचे ठाणेदार पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या पथकाने केली.घरातून धारदार शस्त्र जप्तसावकार संतोष भोसले शेतकर्यांना धाकदपट करून त्यांच्याकडून वसुली करतो आणि आणि बळजबरीने त्यांची शेती नावावर करतो. त्यासाठी शेतकर्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवितो. त्याच्या घरावर घातलेल्या छाप्यात अमेरिकन बनावटीचे धारदार शस्त्रही मिळून आले असून, पोलिसांनी शस्त्र जप्त केले. दुस-याच्या नावावर बळकावली शेतजमीनसावकार संतोष भोसले याने शेतकरी संतोष इंगळे यांची गट नं. ९२ मधील ८१ आर शेती रवींद्र तेलंग (रा. केशव नगर), ८१ आर प्रताप शिवदास इंगळे यांच्या नावे करून नंतर स्वत:च्या नावावर उतरून घेतली. ३३ आर जमीन ही संतोष जनार्दन पागृत (रा. घुसर) यांच्या नावे केली आहे. मनकर्णा पाचपोहे यांची जमीन गट नं. ३१/२ यामधील १ हे. जमीन ही नीतेश श्रावण सिरसाट (रा. उगवा) व ४१ आर. हे दिनकर शेषराव इंगळे (रा. कोठारी वाटिका नं. ३, मलकापूर) यांच्या नावे करून नंतर भुपेंद्र मोरे व त्याच्या भावाच्या नावे केली असल्याचे तपासणीतून उघड झाले.