सलूनमध्ये गुंडांचा धुडगूस

By Admin | Updated: September 8, 2014 00:37 IST2014-09-08T00:37:44+5:302014-09-08T00:37:44+5:30

अकोला येथील वाशिम बायपासवरील घटना

Hooters in the saloon | सलूनमध्ये गुंडांचा धुडगूस

सलूनमध्ये गुंडांचा धुडगूस

अकोला : केश कापल्यानंतर दुकानदाराने पैसे मागितल्याच्या कारणावरून, काही गुंडांनी वाशिम बायपासवरील सलून दुकानाची तोडफोड केल्याची घटना रविवारी दुपारी घडली.
भारतवाडीत राहणारे गजानन नामदेव खिरेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी दुपारी वाशिम बायपासवरील तथागतनगरामध्ये राहणारे आरोपी बाबू कांबळे व प्रदीप कांबळे हे केश कापण्यासाठी गणेश नामक सलून दुकानात आले. त्यांनी केश कापल्यानंतर सलून व्यावसायिक गजानन खिरेकर यांनी त्यांना पैसे मागितले असता, दोघांनी त्यांच्यासोबत वाद घालून त्यांच्या दुकानातील काचा फोडल्या. साहित्याची फेकाफेक केली आणि खिरेकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली. जुने शहर पोलिसात तक्रार दिल्यानंतर या गुंडांनी त्यांच्या घरी जाऊन तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला. तक्रार मागे न घेतल्यास पत्नी व मुला-बाळांना जीवे मारण्याची धमकी दिली. खिरेकर यांची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली; परंतु अद्यापपर्यंत आरोपींवर कोणतीही कारवाई केली नाही.

Web Title: Hooters in the saloon