शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीसाठी अर्धा डझन पक्षांमध्ये चढाओढ

By admin | Updated: September 7, 2014 01:42 IST

बाळापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच.

विवेक चांदूरकर / अकोला

जिल्ह्यात सध्या बाळापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी जवळपास अर्धा डझन राजकीय पक्षांमधील इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. अन्य विधानसभा मतदासंघात जेवढे उमेदवार उमेदवारी मागत आहेत, त्यापेक्षा जास्त पक्ष बाळा पूर विधानसभा मतदासंघ त्यांच्यासाठी सोडण्याची मागणी करीत आहेत. शिवसंग्राम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध पक्षाच्या डझनभर नेत्यांनी येथून उमेदवारी मागितली आहे. अकोला जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी सर्वात जास्त नेत्यांची पसं ती ही बाळापूर विधानसभा मतदासंघालाच आहे. विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाने बाळापूर मतदारसंघ मागितला आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही बाळापूर मतदारसंघ मागितला आहे. भाजपच्या वाट्यावर आलेल्या बाळापूर मतदारसंघावर शिवसेनेच्या काही पदाधिकार्‍यांना दावा केला आहे. तसेच आघाडीतील कॉँग्रेसकडे असलेल्या हा म तदारसंघ मिळावा यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे सर्वच पक्षाची बाळापूर मतदारसंघ मिळविण्यासाठी होड लागली आहे. बाळापूर मतदारसंघाचे सध्याचे आमदार भारिपचे बळीराम सिरस्कार आहेत. एखाद्या म तदारसंघात आपल्याच पक्षाचा विद्यमान आमदार असला तर त्याची तिकीट कापणे व उमेदवारी मागणे कठीण असते. मात्र, अन्य पक्षाचा आमदार असला तर उमेदवारीवर दावा करणे सहज सोपे असते. सेना-भाजप व काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांना बाळापूरमध्ये ही संधी मिळाली आहे. त्यातच शिवसंग्राम व स्वाभिमानीची भर पडली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष बाळापूर विधानसभा मतदासंघाकडे लागले आहे. गत निवडणुकीत हा मतदारसंघ यु तीतून भाजपच्या तर आघाडीतून काँग्रेसच्या वाट्याला गेला होता. मात्र या ठिकाणी दोन्ही पक्षाचा उमेदवार पडल्याने सेना व राष्ट्रवादीनेही या मतदारसंघावर दावा केला आहे. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी मूर्तिजापूर अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे.