शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरातील दहा मार्गांवर जड वाहतुकीस प्रतिबंध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 14:02 IST

शहरातील प्रमुख दहा मार्गांवर जड वाहतूक तीन महिन्यांसाठी बंद केली आहे.

अकोला: शहरातील मध्यभागी असलेली बाजारपेठ आणि खरेदीसाठी होणारी गर्दीची वाहतुकीची मोठी कोंडी होते. त्यातही जड वाहतूक शहरातील प्रमुख मार्गांवरून जात असल्यामुळे नागरिकांना त्रास होतो. वाहतुकीचे नियंत्रण करता यावे आणि जड वाहतुकीला प्रतिबंध घालावा, या दृष्टिकोनातून शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक सदानंद मानकर यांनी मंगळवारी शहरातील प्रमुख दहा मार्गांवर जड वाहतूक तीन महिन्यांसाठी बंद केली आहे.अकोला शहरात गांधी रोड, टिळक रोडवर कापड बाजार, किराणा बाजार, कोठडी बाजार असल्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी होते. या रस्त्यांवर जड वाहतूकही मोठ्या प्रमाणात होते. या मार्गांवर शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृह, बँक, धार्मिक स्थळे आणि प्रतिष्ठाने असल्यामुळे मोठी वर्दळ असते. त्यात जड वाहतूकही होत असल्यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. अपघातसुद्धा घडतात. त्यामुळे या मार्गावरील जड वाहतुकीला पायबंद घालणे आवश्यक आहे. त्यासाठी या मार्गांवरील रहदारी सुरळीत होऊ शकेल, तसेच इतर बाजारपेठेच्या परिसरात सकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत ग्राहकांची व व्यापारी वर्गाच्या मालवाहू वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असते. त्यामुळे बाजारपेठेच्या परिसरात सामान्य नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी व खरेदी-विक्रीसाठी जाणे-येणेसुद्धा अवघड होते. या सर्व कारणास्तव ४ आॅगस्ट ते ३ नोव्हेंबर या कालावधीत शहरातील दहा मार्गांवर जड वाहनांना प्रतिबंध घालण्यात आला आहे.

या मार्गांवर जड वाहतूक बंदशालिनी टॉकीज ते अकोट स्टॅन्ड, दगडी पूल ते माळीपुरा चौक, अकोट स्टॅन्डकडून सिटी कोतवाली चौकाकडे येणारा मार्ग, अकोट स्टॅन्ड ते अग्रेसन चौकाकडे येणारा मार्ग, अग्रेसन चौक ते बाजारपेठेत जाणारा मार्ग, टॉवर चौक ते फतेह अली चौकाकडे जाणारा मार्ग, रेल्वे स्टेशन मालधक्का ते रामदासपेठ पोलीस ठाण्याकडून दामले चौक ते फतेह अली चौकाकडे जाणारा मार्ग, बाळापूर नाकाकडून शहरात येणारा मार्ग, वाशिम बायपासकडून शहरात येणारा मार्ग, डाबकी रोड रेल्वे फाटकाकडून शहरात येणाऱ्या मार्गावर पुढील तीन महिने जड वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाTrafficवाहतूक कोंडी