शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

अकोल्यातील माता नगरमध्ये भीषण आग; ६० झोपड्या जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:54 PM

अकोला: रामदास पेठ पोलिस ठाण्याला लागून असलेल्या माता नगरमध्ये गुरुवार, २२ फेब्रुवारी रोजी दुपारी भीषण आग लागून पाच ते सहा सिलींडरचा स्फोट झाला.

ठळक मुद्देअग्नितांडवामध्ये माता नगरातील तब्बल ६० झोपड्या जळून खाक झाल्या. यामध्ये लाखो रुपयांची हानी झाली असून, ३० ते ३५ संसार उघड्यावर आले आहेत. या घटनेत अनेक झोपडयांमधील १५ सिलिंडर सुरक्षितरित्या हलविण्यात आल्याने आग आणखी पसरली नाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.बहुतांश घरातील नागरिकांना पैसे व दागिने घेण्यास वेळ न मिळाल्याने लाखो रुपयांचा ऐवज व रोकडही या आगीत खाक झाली.

- सचिन राऊत

अकोला - रामदास पेठ पोलीस ठाण्याला लागून असलेल्या माता नगरमध्ये सिलिंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत तब्बल अकरा गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या भीषण अग्नितांडवामध्ये माता नगरातील तब्बल ६० झोपड्या जळून खाक झाल्या. यामध्ये लाखो रुपयांची हानी झाली असून, ३० ते ३५ संसार उघड्यावर आले आहेत; या घटनेत अनेक झोपडयांमधील १५ सिलिंडर सुरक्षितरित्या हलविण्यात आल्याने आग आणखी पसरली नाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.माता नगर झोपडपट्टीतील एका घरातील सिलिंडरला अचानक गळती लागली. या सिलिंडरच्या गळतीमुळे काही क्षणातच सदर गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर या घराला असलेल्या कुडाच्या काडयामुळे व लाकडं जळाल्याने ही आग आजुबाजूच्या झोपड्यांना लागली. त्यानंतर आजुबाजूच्या घरातील तब्बल ११ सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे हा परिसर हादरला. बाजूलाच असलेल्या दोन शाळेतील विद्यार्थ्यांनी या आवाजामुळे आरडा-ओरड सुरू केली. मुलांच्या किंकाळ्या सिलिंडरचा स्फोट व प्रचंड धूर या परिसरातून निघायला सुरुवात झाल्याने या परिसरात स्मशानासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. काही क्षणातच झालेल्या  सिलिंडरच्या स्फोटामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. या आगीत माता नगरातील संपूर्ण झोपडपट्ट्या खाक झाल्या. बहुतांश घरातील नागरिकांना पैसे व दागिने घेण्यास वेळ न मिळाल्याने लाखो रुपयांचा ऐवज व रोकडही या आगीत खाक झाली. यामध्ये मोठे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती महसूल खात्याच्या अधिकाºयांनी दिली. या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीची माहिती मिळताच रामदास पेठ पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या व खासगी पाण्याच्या तब्बल ५० बंबाद्वारे ही आग आटोक्यात आणण्यासाठी कसोसीने प्रयत्न करण्यात आल्यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास ही आग नियंत्रणात आली.  

पोलिस वसाहतलाही झळमाता नगरला लागूनच असलेल्या रामदास पेठ पोलिस वसाहतमध्ये या आगीची झळ पोहोचली. पोलिस वसाहत तातडीने खाली करण्यात आली. या आगीमूळे माता नगरासह पोलिस वसाहत व बाजुलात असलेल्या दोन शाळेतील विद्यार्थ्यांनाही प्रचंड त्रास झाल्याची माहिती आहे. पोलिस वसाहत व माता नगर झोपडपट्टीच्या आगीत लाखोंची हाणी झाल्याची माहिती आहे.शाळेतील विद्यार्थ्यांचा आकांडतांडवमाता नगर झोपडपट्टीला लागून असलेल्या उर्दु शाळेसह नुतन हिंदी शाळेतील विद्यार्थ्यांना आग दिसताच घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी मोठा आकांडतांडव केला. विद्यार्थी जोरजोरात रडल्याने या परिसरात भयावह परिस्थीती निर्माण झाली होती. या परिसरातील नागकिांनी तातडीने धाव घेउन दासेन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर काढले. या आगीमूळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाल्याची चर्चा घटनास्थळावर होती.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरRamdas Peth Police Stationरामदासपेठ पोलीस स्टेशनfireआग